Share

नवा प्रदेशाध्यक्ष कोण ? रावसाहेब दानवेंनी दिली ‘ही’ भन्नाट प्रतिक्रिया….

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : मोदी सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळात राज्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे राज्यातले प्रदेशाध्यक्षपद हे रिक्त झाले आहे. या रिक्त झालेल्या पदाची जबाबदारी कोणाकडे देयची यासाठी भाजप कडून अनेक नेत्यांची चाचपणी सुरु आहे. सध्या राज्याच्या महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री पंकजा मुंडे , जलसंपदा मंत्री गिरीश महाजन ,महसूल मंत्री चंद्रकांत पाटील , यांची नावे प्रदेशाध्यक्ष पदासाठी अग्रणी आहेत. तर इचलकरंजीचे आमदार सुरेश हळवणकर, गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण अशा भाजपमधील दुसऱ्या फळीतील तरुण नेत्यांच्या नावाचीही जोरात चर्चा आहे. मात्र आता यावर राज्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपचा प्रदेशाध्यक्ष कोण होणार, याबाबत रावसाबे दानवे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर दानवे यांनी हे नाव जाहीर करण्यास नकार दिला. ‘कशाला माझ्या तोंडून नाव काढून घेता,’ अशी मिश्किल प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील ज्येष्ठ नेते हे निवडणुकीची तयारी करण्यात व्यस्त आहेत. तर या प्रदेशाध्यक्ष पदासाठी ते फारसे उत्सुक नसल्याचे दिसत आहेत. त्यामुळे दुसऱ्या फळीतील नेत्यांची या प्रदेशाध्यक्ष पदासाठी वर्णी लागण्याची शक्यता आहे. तसेच ज्येष्ठांऐवजी तुलनेने तरुण नेतृत्वास प्रदेशाध्यक्षपद द्यावे, असा विचार भाजपमध्ये सुरु आहे.त्यामुळे भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची माळ नक्की कोणाच्या गळ्यात पडणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!