Share

‘नाल्यातील तरंगता गाळ काढायला अजून 47 कोटीचे कंत्राट ; गाळ कुणाच्या खिशात जाणार?’

Published On: 

मुंबई : मुंबईत झालेल्या पहिल्याच पावसात पालिकेचे नालेसफाईसह सारे दावे पोकळ ठरल्याचा अनुभव मुंबईकरांनी नुकताच घेतला. पालिकेकडून नाल्यांमधील गाळ काढला जात असतानाच आता तरंगता कचरा उचलण्याचेही पालिकेने ठरविले आहे. शहरातील नदी-नाल्यांमधील तरंगता कचरा उचलण्यासाठी पालिकेने ३ वर्षांच्या कंत्राटास ४७ कोटी रुपये मोजण्याचे ठरविले आहे. त्यासाठी पहिल्यांदाच ट्रॅश बूमसह तराफ्याचा वापर केला जाणार आहे.

याच मुद्द्याला धरून आता भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आता हा तरंगता गाळ कुणाच्या खिशात जाणार? असा सवाल केला आहे. यापूर्वीही आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेच्या नालेसफाईच्या दाव्याची पडताळणी करण्यासाठी मुंबईतील नाल्यांची पाहणी केली होती. तसंच या मुद्द्यावरुन शिवसेनेवर जोरदार हल्लाही चढवला होता.

107 टक्के नालेसफाई तर गाळात गेली. आता फ्लोटिंग म्हणजे तरंगता गाळ काढण्यासाठी 47 कोटीचं कंत्राट दिलं जात आहे. याचा अर्थ याआधी मुंबई महापालिका नाल्यातील रुतलेला गाळ, नाळ्याच्या वर दिसणारा गाळ, नाल्यावरील तरंगता गाळ काढण्यासाठी जे खर्च करत होते आणि कंत्राटदाराला मलिदा देत होते.

त्यात अजून 47 कोटीची भर ही शिवसेनेची महापालिका टाकतेय. हा गाळ कुणाच्या खिशात चाललाय? गाळाच्या निमित्ताने कंत्राटदाराला मिळणाऱ्या मलिद्यातील वाटेकरी कोण आहेत? हे शिवसेनेनं स्पष्ट करावं, असा गंभीर आरोप आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका अर्थात शिवसेनेवर केला आहे.

दरम्यान, पालिकेकडून होणाऱ्या नालेसफाईवर दरवर्षी मोठ्या प्रमाणात टीका होते. यंदाही अपेक्षित नालेसफाई न झाल्याने पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या. पालिकेकडून नालेसफाईसाठी दरवर्षी सुमारे १०० कोटी रुपये खर्च केले जातात. एवढा निधी खर्च करूनही दर पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा होत नसल्याने सर्वसामान्य नागरिक कमालीचे नाराज आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!