Share

८ वी व ९ वीत खेळलेल्या खेळाडूंनाही मिळणार १० वीला क्रीडा गुण!

Published On: 

लातूर: माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत क्रीडा आयुक्तांनी सर्व जिल्‍हा क्रीडा अधिकाऱ्यांना सुचीत केलेले आहे. कोविड-१९ च्या प्रादुर्भामुळे सन २०२०-२१ या वर्षात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता १० वी साठी बाबतीत इयत्ता ८ वी व ९ वी मध्ये शिकत असताना सदर खेळाडूने विविध स्पर्धेतील सहभाग विचारात घेण्यात येणार आहे.

तसेच १२ वी साठी प्रविष्ठ होणाऱ्या (खेळाडू) विद्यार्थ्यांच्या बाबतीत सदर विद्यार्थी इयत्ता ११ वी मध्ये शिकत असताना सदर खेळाडूने विविध स्तरावरील स्पर्धेतील सहभाग विचारात घेवून सन २०२०-२१ मध्ये क्रीडा गुणांची सवलत देण्यात येणार आहे. त्यामुळे आता खेळाडू विद्यार्थ्यांना गुण वाढवून घेण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे, मात्र यासाठी प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. तरी लातूर जिल्हयातील पात्र खेळाडू,क्रीडा शिक्षक,मुख्याध्यापक व प्राचार्य यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

लातूर जिल्हयातील पात्र खेळाडू, क्रीडा शिक्षक, मुख्याध्यापक व प्राचार्य यांनी नोंद घ्यावी व शिक्षण मंडळाचा क्रीडा सवलत गुणासाठी असलेला जुनाच फॉरमॅट वापरुन परिपुर्ण प्रस्ताव जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, लातूर येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत व सदर प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दिनांक २१ जून २०२१ आहे.अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,जिल्हा क्रीडा संकुल,औसा रोड,लातूर येथे संपर्क साधावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!