मुंबई : अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटक प्रकरणात सुरु असलेल्या चौकशीत प्रत्येक दिवशी नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. तर, एटीएसने देखील सचिन वाझेंना या प्रकरणात आरोपी म्हणून घोषित केलं आहे.
मनसुख हिरेन प्रकरणात NIAने आणखी एका पोलिस अधिकाऱ्याला आज अटक केली. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवल्याप्रकरणी सर्वप्रथम सचिन वाझेला अटक करण्यात आली होती. त्यानंतर NIAने पोलीस अधिकारी रियाझ काझीला अनेकदा चौकशीसाठी बोलावल्यानंतर ११ एप्रिलला अटक केली. त्यापुढे NIA चा तपास सुरू होता. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचमधील अनेक पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी केली जात होती. त्यानंतर अखेर मनसुख हिरेन प्रकरणात आणखी एका पोलिसाला अटक करण्यात आली. सुनील माने यांनाही अनेकदा चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. त्यानंतर आज NIAने माने यांना अटक केली.
स्फोटकांच्या कटात सामील असणे आणि त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मदत करणे या आरोपांखाली सचिन वाझेचा सहकारी रियाज काझीला अटक करण्यात आले होते. या प्रकरणातील ही मुंबई पोलिसांची दुसरी अटक होती. त्यानंतर अँटिलिया स्फोटक प्रकरणात NIAने पोलिस अधिकारी सुनिल मानेला आज अटक केली. माने यांनीच या प्रकरणात मनसुखवर गुन्हा कबूल करण्यासाठीही दबाव टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दहशतवाद विरोधी पथकाच्या काळाचौकी युनिटमध्ये गेल्या महिन्यात सुनील माने यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे हस्तांतरित करण्यात आला होता. आता सुनील मानेंना एनआयएने अटक केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज्यातील अठरा वर्षावरील ३६ लाख विद्यार्थ्यांचे होणार लसीकरण – उदय सामंत
- ‘विरारसारख्या घटना वारंवार घडताहेत, कठोर पावलं उचलणे गरजेचे’, मंत्री वर्षा गायकवाड यांचे ट्विट
- कोरोना परिस्थितीवर पंतप्रधान मोदींची आज उच्चस्तरीय बैठक
- धक्कादायक बातमी : विरारमध्ये कोव्हिड रुग्णालयाला मध्यरात्री भीषण आग, १३ रुग्णांचा मृत्यू
- ‘हवं तर मी तुमच्या पाया पडतो पण महाराष्ट्राला रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन द्या!’


