Share

राष्ट्रवादीचा आणखी एक आमदार भाजपच्या वाटेवर ?

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे दिवंगत नेते वसंत डावखरे यांचे चिरंजीव आमदार निरंजन डावखरे यांनी सोडचिठ्ठी देऊन भाजपची वाट धरली आहे. स्थानिक राजकारण्यांकडून करण्यात येणाऱ्या कुरघोड्यांना कंटाळून काल निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकला. डावखरे यांनी भाजपची वाट धरल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. हे सर्व सुरु असताना आता राष्ट्रवादीचा आणखी एक आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

निरंजन डावखरे यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला. मात्र यावेळी निरंजन डावखरे यांना भाजप कार्यालयापर्यंत सोडण्यासाठी चक्क राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र पाटील आले होते.त्यामुळे निरंजन डावखरेंपाठोपाठ राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे.

नरेंद्र पाटील हे माथाडी कामगार नेते आहेत. निरंजन डावखरेंप्रमाणेच नरेंद्र पाटील हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेतील आमदार आहेत.नरेंद्र पाटील हे माथाडी कामगार संघटनेचे नेते आणि संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र आहेत.निरंजन डावखरे आणि नरेंद्र पाटील हे खूप चांगले मित्र आहेत. मित्राला साथ देण्यासाठी आलो होतो अशी प्रतिक्रिया एका वृत्तवाहिनीशी बोलताना नरेंद्र पाटील यांनी दिली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!