Share

सोनु सुदच्या सन्मानात आणखी एक मानाचा तुरा; फोर्ब्सकडून कोवीड १९ लीडरशिप अवॉर्ड प्रदान

Published On: 

मुंबई : सोनू सुद म्हणले की लोकांना आठवायचा आधी दंबग मधला छेदी सिंग. मात्र मागील वर्षी आलेल्या कोरोना संसर्गाच्या काळात सोनुने आपली छेदी सिंगची प्रतिमा पुर्णपणे छेदुन टाकली. कोरोना संसर्गाच्या काळात सोनु सुदने लोकांना इतकी मदत केली की तो खराखुरा हिरो बनला. त्याच्या याच कार्याची दखल घेत फोर्ब्सने सोनुला लीडरशिप अवॉर्ड देऊन २०२१ सन्मानीत केले आहे.

या अवॉर्डबाबत स्वत: सोनु सुदने ट्विट करुन आभार मानले आहे. गेल्या वर्षी कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखता यावा म्हणून देशभरात लॉकडाउन जाहिर केले होते. याकाळात इतर प्रांतात पोट भरण्यासाठी गेलेल्या अनेक मजुरासाठी घरी जाणे अवघड बनले होते. त्यावेळी बॉलीवूडचा अभिनेता सोनु सुद समोर आला. मुंबईत तसेच राज्यात इतर ठिकाणी आडकलेल्या मजुरांना त्यांच्या मुळ गावी परतण्यासाठी सोनु सुद आणि त्याच्या टीमने मोठे काम केले.

त्या काळात सोनु सुद सर्वासाठी देवदुत बनुन धावून आला. त्याच्या या कामाची दखल घेत त्याला अनेक सन्मान मिळाले. या सन्मानात आणखी एक भर पडली आहे. ती म्हणजे फोर्ब्सच्या लीडरशिप अवॉर्डची. या पारीतोषकाबद्दल सोनु सुदने स्वत: या अवॉर्डचा फोटो ट्विट करुन माहिती दिली आहे. या अवॉर्डबद्दल त्याने आभार मानले आहे. कोरोना संसर्गामुळे हा पुरस्कार सोहळा ऑनलाइन पार पडला होता.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!