Share

आणखी एका जिल्ह्यात होणार १५ ते 30 जुलै दरम्यान लॉकडाऊन

Published On: 

🕒 1 min read

लातूर (प्रतिनिधी)- लातूर जिल्ह्यात अलीकडच्या काळात वाढत चाललेला कोविड१९ प्रादुर्भाव लक्षात घेता १५ जुलै पासून जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात येत असल्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी घोषित केले आहे. या संदर्भातील अधिक तपशील जिल्हाधिकारी जी. श्रीकांत लवकरच जाहीर करतील असे त्यांनी म्हंटले आहे.

अनलॉक २ च्या काळात बऱ्याच व्यवस्था सुरू झाल्या आहेत, मात्र या काळात रेडझोनमधून अनेक प्रवाशी जिल्ह्यात आले आहेत परिणामी कोविड१९ चा प्रादुर्भाव वाढला आहे, रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ही साखळी तोडणे आवश्यक बनले आहे.

एकंदरीत परिस्तिथीतिचा विचार करता संभाव्य धोका टाळण्यासाठी लातूर जिल्ह्यात १५ ते 30 जुलै दरम्यान पुन्हा लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे पालकमंत्री ना अमित देशनमुख यांनी म्हंटले आहे, लॉकडाऊन मध्ये कोणत्या सुविधा कशा प्रकारे सुरू राहतील याचा तपशील जिल्हाधिकारी जी श्रीकांत लवकरच जाहीर करतील असे त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या-

सध्याचे मुख्यमंत्री हे घरात बसून केवळ आदेश देण्यात मग्न आहेत- आठवले

#DilSeThankYou : रात्रंदिवस काम करणार्‍या पोलिसांचे अक्षय कुमारने मानले अनोख्या पद्धतीने आभार

प्रकृती ठणठणीत असून मी क्वारंटाइन असल्याचे वृत्त खोटे- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!