Share

भाजपचा अजून एक मित्रपक्ष NDAतून बाहेर पडणार?; ८ डिसेंबरनंतर घेणार मोठा निर्णय!

Published On: 

नवी दिल्ली:- केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करत शिरोमणी अकाली दल NDA तून बाहेर पडला. शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामाही दिला आहे. केंद्राच्या नव्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज १२ वा दिवस आहे. या आंदोलनाला देशभरातून समर्थन मिळताना दिसत आहे. त्यातच आता भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे नेते आणि नागौरचे खासदार हनुमान बेनीवाल यांनीही शेतकरी आंदोलनाला समर्थन दिलं आहे.

शेतकरी आंदोलनाला देशभरातून समर्थन मिळत असतांनाच त्यातच कृषी कायद्याविरोधात भाजपला NDAतील मित्रपक्षांच्या विरोधालाही सामोरं जावं लागत आहे. राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी कृषी कायद्याच्या विरोधात असल्याचं हनुमान बेनिवाल यांनी रविवारी जाहीर केलं. पंतप्रधान मोदी यांनी हे कायदे परत घ्यावेत अशी मागणीही त्यांनी केली आहे. इतकच नाही तर RLP ही NDA चा घटक पक्ष राहिल की नाही याचा निर्णय ८ डिसेंबरनंतर घेतला जाईल असंही बेनिवाल यांनी जाहीर केलं आहे.

दरम्यान, शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेसनं व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी पाठिंबा दिला आहे. मोठ्या संख्येनं या भारत बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेकडून करण्यात आलं आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करत यापूर्वी शिरोमणी अकाली दल NDA तून बाहेर पडला आहे. त्यानंतर शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि कार्यकर्त्या आक्रमकपणे केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात आंदोलनात सहभागी झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!