Share

हिवाळी अधिवेशनात होणार कर्जमाफीची घोषणा ?

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : येत्या १६ डिसेंबर पासून राज्यातील हिवाळी अधिवेशनाला सुरवात होणार आहे. त्यामुळे राज्यातील नवीन महाविकासआघाडीचे सरकार या अधिवेशनातून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करणार असल्याचे बोलले जात आहे. तर कर्जमाफीची घोषणा होणार असल्याची चर्चा आहे. त्यामळे या अधिवेशनाकडे शेतकरी वर्ग हा खासकरून लक्ष देऊन बसला आहे.

यंदाचे अधिवेशन एकच आठवड्याचे घोषित करण्यात आले आहे. तीन पक्षाचे सरकार असल्याने अद्याप मंत्रिमंडळ तसेच खातेवाटपसुद्धा झालेले नाही. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची विरोधीपक्षनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विरोधकांची संख्यासुद्धा मोठी आहे. त्यामुळे यंदाचे अधिवेशन आरोप-प्रत्यारोपाने चांगलेच गाजण्याची शक्यता आहे.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, दुसरीकडे राज्यावर सहा लाख कोटींचे कर्जसुद्धा आहे. यावर श्वेतपत्रिका काढण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन कसे पूर्ण करतात याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1201729917353787392?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1201728134648713217?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1201724877113159680?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!