टीम महाराष्ट्र देशा : राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काल याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३१ मार्च पर्यंत संपूर्ण लॉक डाऊन जाहीर केला आहे तसेच गरज पडल्यास याचा कालावधी पुढेही वाढवला जाऊन शकतो असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
यावेळी ज्यांचं पोट हातावर आहे त्यांना मालकांनी किमान वेतन द्याव असाही आवाहन त्यांनी केलं आहे. या संकटातून मार्ग काढताने माणुसकीच दर्शन घडावं असही आवाहन त्यांनी केलं आहे.
आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारने आर्थिक नुकसानीची भरपाई म्हणून आर्थिक पॅकेज जाहीर करावं अशी मागणी केली आहे. त्यांनी ट्वीटरवर मागणी केली आहे . ते म्हणाले,
‘इतर राज्य सरकारांप्रमाणेच महाराष्ट्र राज्य शासन मदत पॅकेजेस घोषित करीत नाही ?? प्रत्येक स्तरावर होणारी मोठी आर्थिक हानी मोठी आहे त्यामुळे सरकारने मदत करणे आवश्यक आहे.. भावनिक बोलताना लोकांना मदतीचीही गरज आहे. बंद करण्या बरोबरच मदत पॅकेज जाहीर करणे आवश्यक आहे! ‘
Y isn’t the Maharashtra State Gov declaring relief packages like the other state guvs??
Big economic damages at every level which needs help frm the state guv.. while doing all the emotional talk people also need helping hand..
Shutdown along with a relief package is needed!— Nitesh Rane (@NiteshNRane) March 22, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

