टीम महाराष्ट्र देशा – राज्यात आणि देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यापासून सोशल मिडीयावर निरनिराळ्या अफवाही पसरत आहेत. यात चिकन आणि कोरोना यांचा संबंध जोडल्याच्या अफवांचा सर्वाधिक फटका राज्यातील पोल्ट्री व्यावसायिकांना बसला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी काही दिवसापूर्वी राज्य शासनाने प्रति पक्षी ५० रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली होती. आता भाजपचे आमदार आशिष शेलार यांनीही पोल्ट्री व्यावसायिकांच्या मदतीसाठी पॅकेज जाहीर कराव अशी मागणी केली आहे.
आशिष शेलार यांनी याबाबतच निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. याची माहिती त्यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर दिली आहे. ‘कोरोना व्हायरसबाबत चुकीची माहिती पसरल्याने पोल्ट्री व्यवसायाचे ६०० कोटी पेक्षा जास्त नुकसान झाले असून या व्यवसायिकांना आर्थिक मदतीचे पॅकेज सरकारने जाहीर करावे, अशी मागणी मी आज मुख्यमंत्र्यांना पत्र लिहुन केली.’
कोरोना व्हायरसबाबत चुकीची माहिती पसरल्याने पोल्ट्री व्यवसायाचे 600 कोटी पेक्षा जास्त नुकसान झाले असून या व्यवसायिकांना आर्थिक मदतीचे पॅकेज सरकारने जाहीर करावे, अशी मागणी मी आज मुख्यमंत्र्यांना पत्र लिहुन केली. pic.twitter.com/6WbMxGEIMC
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) March 17, 2020
दरम्यान राज्य शासनाकडून अद्याप यावर कुठलाही निर्णय झाल्याची माहिती नाही.

हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

