Share

तीन वर्षे आश्वासनं आणि चर्चा झाल्या आता ठोस निर्णय घ्या; केंद्र सरकारवर अण्णा बरसले

Published On: 

अहमदनगर : केंद्र सरकारने केलेल्या तिन्ही कृषी विधेयकाविरोधात शेतकऱ्यांचे दिल्लीच्या वेशीवर आंदोलन सुरु आहे. यावर तोडगा काढण्यासाठी शेतकरी आणि केंद्र सरकारच्या चर्चा निष्फळ ठरत आहे. सरकार चर्चेला तयार आहे. पण कृषी कायदे रद्द केले पाहिजेत त्यानंतरच चर्चा असे शेतकऱ्यांची मागणी आहे.

दरम्यान,कृषी कायद्यांचा निषेध करत शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या आंदोलना ला तब्बल महिना झाला आहे. दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर उभ्या असलेल्या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारशी कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यास नकार देत कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करत आहेत.

दरम्यान,जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी जानेवारी महिन्यात आपण पुन्हा उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं आहे. काल एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे त्यांनी ही घोषणा केली. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी केंद्र सरकारने स्विकारल्या असल्यामुळे राज्य सरकारच्या कृषीमूल्य आयोगाच्या शिफारशीही जशाच्या तशा स्विकाराव्या. शेतकऱ्यांना प्रत्येक पिकाचा उत्पादन खर्च देऊन अधिक 50 टक्के असा हमीभाव मिळायला हवा. अन्नधान्या बरोबरच फळं, फुलं, भाजीपाला, दुध यांचाही हमीभाव ठरवून द्यावा त्याचबरोबर केंद्रीय कृषीमूल्य आयोगाला निवडणूक आयोगाप्रमाणे स्वतंत्र संवैधानिक दर्जा द्यावा अशी मागणीही हजारे यांनी केली आहे.

या मागण्या पंतप्रधान आणि केंद्रीय कृषिमंत्र्यांनी लेखी आश्वासन देऊन मान्य केल्या आहेत, त्याचं पालन करा. तीन वर्षे आश्वासनं आणि चर्चा झाल्या आता ठोस निर्णय घ्या. अन्यथा मी निर्णयावर ठाम आहे असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीस अण्णा हजारे यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना पत्र लिहून सांगितले की, त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आपण उपोषणास बसू. विशेष म्हणजे, भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे यांनी नुकतीच हजारे यांची भेट घेतली आणि त्यांना केंद्राने सादर केलेल्या तीन कृषी कायद्याची माहिती दिली. शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदच्या समर्थनार्थ हजारे यांनी ८ डिसेंबर रोजी उपोषण केले होते. ज्यात कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली होती.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!