🕒 1 min read
औरंगाबाद : मंगळवारी शहरात झालेल्या जोरदार पावसाने शहरात एकच दाणादाण उडाली. गुलमंडी परिसरातील व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने व्यापारी संतप्त झाले औषधी भवन जवळील नाल्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे मात्र प्रशासनातील अधिकारी आणि नेते या ठिकाणी पाहणी करून जातात. यावरून अनेक व्यापारी संतप्त झाले होते. नेमके त्याच वेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे पदाधिकाऱ्यांसह पाहणीसाठी आले. त्यावेळी व्यापारी आणि शिवसेना नेत्यांमध्ये बाचाबाची झाली. तुम्ही आमचे फोन उचलत नाही असे म्हणत व्यापारी संतप्त झाले. मात्र खैरे ‘मेरे जैसा लिडर तुमको नही मिलेगा असे म्हणत स्वतःचीच स्तुती करण्यात मग्न होते.
मंगळवारी रात्री औरंगाबाद शहरात मोठ्या प्रमाणावर ढगफुटी झाली. यात गुलमंडी भागातील अनेकांच्या दुकानात पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे गुलमंडी, दलालवाडी परिसरात पाहणी करण्यासाठी पोहोचले. मात्र याआधी दोन वेळा औषधी भवनजवळील नाल्याची त्यांनी पाहणी केली आहे. मात्र त्यानंतर काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे येथील संतप्त व्यापारी, नागरिकांनी खैरेंना घेराव घालत तुम्ही आमचे फोनही उचलत नाही म्हणत जाब विचारण्यास सुरुवात केली.
यावेळी व्यापारी आणि खैरे यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. हमरीतुमरीवर येत व्यापाऱ्यांनी मनपा प्रशासनाला खैरेंसमोरच शिव्यांची लाखोली वाहिली. बुधवारी (दि.८) शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पाहणी करण्यासाठी पोहोचले. विटखेडा, उल्कानगरी, खिंवसरा पार्क, विद्यानगर, बाळकृष्णनगर, गुलमंडी, पैठणगेट, दलालवाडी, औरंगपुरा नाला, औषधी भवन नाला आदी भागात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त झालेल्या दुकानांचे, घरांचे पंचनामे करुन मदतीची मागणी त्यांनी केली. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, माजी आमदार किशनचंद तनवाणी, आदींची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- मंत्री आदित्य ठाकरेंची सुचना; शिर्डीत पर्यटन माहिती केंद्र सुरू होणार
- अतिवृष्टीग्रस्त भागात पंचनामे करण्यापेक्षा थेट आर्थिक मदत करा – मनीषा मुंढे
- बहुचर्चित नादरपुर-पिंपरखेड अंजना नदी वरील पुलाचा मार्ग मोकळा
- गोल्डन बॉय नीरज चोप्राची विराटला टक्कर; कमाईमध्ये अव्वल येण्याची शक्यता
- पोलीस बंदोबस्तात पार पडली ‘पोलीसां’ची परीक्षा!

