🕒 1 min read
सोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश आणि न्यायदंडाधिकारी परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून, या परीक्षेत अनिता हवालदार राज्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. या परीक्षेत एकूण १९० उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती एमपीएससीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी परीक्षेत अनिता दादा हवालदार या अश्या माढा तालुक्यातील उपळाई खुर्द येथील रहिवाशी आहेत. चिखलठाण (ता. करमाळा) येथील रहिवासी असलेले हवालदार कुटुंबांची घरची परिस्थिती हलाखीची असल्याने कामाच्या शोधात ते उपळाई खुर्द येथे 10 वर्षांपासून स्थायिक आहेत.
इच्छाशक्ती अन् जिद्द उराशी बाळगत प्रयत्नांची पराकाष्ठा केली की काहीच अशक्य नसतं. याचा प्रत्यय अनिता दादा हवालदार हिने कृतीतुन दाखवुन दिलंय. दादा हवालदार व सुनिता हवालदार या शेतकरी दामपत्यांची ही लेक असुन कायद्याच्या परीक्षेत वयाच्या 26 व्या वर्षी यशस्वी ठरली आहे.
उपळाई सारख्या खेड्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अनिता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून निवड झाल्याने आता अनिताच्या रुपाने गावातील पहिली महिला क्लास वन अधिकारी ठरली आहे. अनिता यांनी पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण खलठाण जि.प.प्राथमिक शाळा, माध्यमिक शिक्षण उपळाई खुर्द, तर अकरावी बारावी विज्ञान शाखा के.बी.पी काॅलेज पंढरपूर, त्यानंतर सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयातुन एल.एल.बी व एल.एल.एम पदवी घेतले.
दरम्यान, या परीक्षेत दुसऱ्या क्रमांकाने प्रविण भिर्डे, तर तृतीय क्रमांकाने वैशाली निरगुडे उत्तीर्ण झाल्या आहेत. या अंतिम निकालात अर्हताप्राप्त न ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकांची गुणांची पडताळणी करायची आहे, अशा उमेदवारांनी दहा दिवसाच्या आत एमपीएससीकडे ऑनलाइन अर्ज करायचे आहे. या निकालाबाबत अधिक माहिती एमपीएससीच्या वेबसाइटवर प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यामुळे अधिक माहितीसाठी वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन एमपीएससी प्रशासनाने दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1208668311094841346?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1208668088893181952?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
