मुंबई: महाराष्ट्रातील राजकारणात विधान परिषद निवडणुकीनंतर मोठ्या राजकीय हालचाली घडल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. राज्यातील इतर आमदारांनीही शिंदेंच्या वाटेवर पाऊल ठेवत त्यांच्या गटात शामिल होण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये औरंगाबादचे आमदार संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांचाही समावेश आहे. संदीपान भुमरे यांच्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ८ जूनच्या सभेतील पोस्टरवर संदीपान भुमरे यांच्या फोटोला संतप्त शिवसैनिकांनी काळे फासले आहे. याचे अनेक फोटो सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. दरम्यान शहरातील गारखेडा परिसरात शिवसेनेचे मंत्री संदिपान भुमरे यांच्या कार्यालयाला पोलिस प्रशासनाच्या वतीने मोठा बंदोबस्त देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या कालच्या बैठकीनंतर शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संदिपान भुमरे यांच्या कार्यालयासमोर असलेले त्यांचे बॅनरही शिवसैनिकांच्या कडून फाडण्यात आले आहे.त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून पोलीस प्रशासनाने त्यांच्या कार्यालयलासमोर मोठा बंदोबस्त दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- president election : औरंगाबादमधील तरुणाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भरला अर्ज
- Sharad Ponkshe : शरद पोंक्षेंची ‘ती’ इंस्टाग्राम पोस्ट चर्चेत, म्हणाले…
- Sanjay Raut on Fadanvis : आता रात्रीचा शपथविधी होईल मध्ये पडू नका ; राऊतांचा फडणवीसांना टोला
- Dilip Walse Patil : “आमदाराचे संरक्षण काढण्याचे आदेश मुख्यमंत्री वा गृहविभागाने दिलेले नाहीत” – दिलीप वळसे पाटीलांचे स्पष्टीकरण
- Sanjay Raut : “ढुंगणाला पाय लावून पळालेल्यांची सुरक्षेची जबाबदारी…”, संजय राऊतांनी सुनावले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

