सोलापूर : “बाळराजे पाटील-अनगरकरांचा बार्शी संपर्क वाढला” या मथळ्याखाली महाराष्ट्र देशांमध्ये वृत्त प्रकाशित होताच, मोहोळ बार्शी सह संपूर्ण जिल्ह्याचे राजकीय वर्तुळ ढवळून निघाले. त्यामुळे माजी आमदार राजन पाटील यांनी सावध भूमिका घेत, अनगरकर पाटील कुटुंबीयांपैकी कोणीही बार्शीतून विधानसभेची निवडणूक लढणार नसल्याचे फेसबुक द्वारे स्पष्ट केले. त्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळतोय असे वाटत असताना अचानकपणे विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा बाळराजे पाटील यांचे लहान बंधू अजिंक्यराणा पाटील यांनी बाळराजे पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर बार्शी मधून निवडणूक लढवावी, एक कार्यकर्ता म्हणून माझी तशी इच्छा असल्याचे स्वतःच्या फेसबुक द्वारे जाहीर केले. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.

माजी आमदार राजन पाटील हे जिल्ह्यातील मुरब्बी व मातब्बर राजकारण पैकी एक आहेत. कोणतीही राजकीय भूमिका घेण्याअगोदर ते सावध पावले टाकतात. बाळराजे पाटील बार्शीतून विधानसभेची निवडणूक लढवणार म्हटल्यामुळे, बार्शी तालुक्यातील लोकनेते बाबुराव अण्णा यांच्या विचारांना आणि अनगरकर पाटील कुटुंबीयांवर प्रेम असणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये जोश संचारला होता. मात्र बार्शीचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि एकेकाळचे राजन पाटील यांचे राष्ट्रवादीचे पक्ष सहकारी दीलीपराव सोपल यांना राजन पाटील आपले गुरुबंधू मानतात. बाळराजे यांच्या बार्शी एन्ट्री मुळे सहाजिकच ते दुखावले जातील असा विचार माजी आमदार राजन पाटील यांच्या मनात आला असेल. त्यामुळेच त्यांनी “सोशल मीडियाच्या माध्यमातून बार्शीचे भावी आमदार बाळराजे पाटील अशा आशयाच्या पोस्ट व्हायरल होताना बघायला मिळत आहेत. मात्र पाटील कुटूंबाच्या मनात तसा कोणताही विषय नाही.बार्शी तालुक्यातील ५२ गावांनी नेहमीच मला आणि पाटील कुटूंबाला प्रेम आणि पाठबळ दिल आहे. त्याबद्दल त्यांचा कायमच ऋणी असेल, त्यांच्या सुखदुःखात पाटील परिवार कायम सोबत असेल, आमच्या मनात बार्शी मधून लढण्यासंबंधी कसला ही निर्णय झालेला नाही. त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होऊ नये, असे मी इच्छितो” अशा आशयाची माहिती फेसबुक वर पोस्ट करून या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

मात्र दुसऱ्याच दिवशी कमी वयामध्ये कणखर नेतृत्व बनलेले, छोटे युवराज विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील यांनी “बार्शी आणि पाटील कुटुंबाचे गेल्या ३५ वर्षाचे ऋणानुबंध आहेत. मोहोळच्या जनतेप्रमाणेच बार्शीतील जनतेचे प्रेम आणि आपुलकी नेहमीच पाटील परिवाराच्या पाठीशी राहिली आहे. लोकनेते कारखान्याच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून बार्शी तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी वर्गासोबत आपले जवळचे संबंध जोडले आहेत. युवावर्ग यांच्या प्रश्नांची त्यांना योग्य जाण आहे. हे तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वांना माहिती आहे, त्यामुळेच जनतेतून आणि विशेषतः तरुणांच्या मधून होत असलेल्या मागणीच्या आग्रहाखातर बाळराजे पाटील यांनी बार्शी मधून भविष्यात विधानसभा लढवायचा विचार करावा, ते योग्यवेळी अचूक निर्णय घेतीलच मात्र बाळराजे पाटील यांनी बार्शी विधानसभा मधून लेढावी, अशी माझी एक कार्यकर्ता म्हणून इच्छा आहे.” अशा आशयाची फेसबुक पोस्ट करून राजकीय धमाका उडवून दिला. त्यामुळे काही काळ दोन्ही तालुक्यातल्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. शेवटी भविष्यातील राजकारणाचा विचार करून बार्शी आणि मोहोळ तालुक्यातील कार्यकर्त्यांना धाकटे युवराज यांचे म्हणणे पटले. त्यामुळे सर्वच कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बार्शी चे भावी आमदार बाळराजे पाटील असा ट्रेड चालवत सोशल मीडियामध्ये चांगलाच धुमाकूळ घातला.
या सर्व गोष्टींमुळे अनगरकर पाटील कुटुंबीयांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या जिल्ह्यात सर्वत्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. बाळराजे पाटील यांच्या बार्शीच्या राजकीय एंट्री बाबत अनगरकर पिता-पुत्रांनी परस्परविरोधी फेसबुक पोस्ट केल्याने बाळराजे पाटील काय भूमिका घेणार याकडे कार्यकर्त्यांसह राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे. असे असले तरी बाळ राजे यांचा वाढलेला बार्शी संपर्क पाहता येणाऱ्या काळात बार्शीच्या राजकीय वर्तुळात दमदार एंट्री करून भल्या भल्यांची दमछाक करू शकतात असे राजकीय जाणकारांचे बोलले जात आहे.
भाजप नगरसेवकाच्या जुगार अड्ड्यावर छापा प्रकरण…
‘मी लढणाऱ्या बापाचा, लढणारा मुलगा’ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाविकास आघाडीत धुसपूस; खासदार संजय जाधवांनी दिला राजीनामा, राष्ट्रवादीवर केला गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

