Share

अंगणवाड्यांना मिळणार चार हजार नवीन खोल्या : यशोमती ठाकूर

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : पुढील आर्थिक वर्षात अंगणवाड्यांच्या 4 हजार नवीन खोल्या बांधण्याचे नियोजन करण्यात आले असून या ठिकाणी पिण्याचे पाणी, शौचालय आदी पायाभूत सुविधा दर्जेदार उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले.महिला व बालविकास विभाग अंतर्गत ‘राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य आणि पोषण अभियान’ आणि ‘युनिसेफ’च्या विद्यमाने आयोजित पोषण अभियानसंदर्भातील राज्यस्तरीय परिषदेत त्या बोलत होत्या.

बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अंगणवाड्यांचे काम महत्त्वाचे आहे. राज्यातील सर्व अंगणवाड्या कार्यान्वित करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने अंगणवाडी सेविकांची साडेपाच हजार रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. असे ठाकूर यांनी सांगितले.

अंगणवाड्यांच्या खोल्या बांधण्यासाठी जिल्हा नियोजन समिती, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना तसेच ग्रामपंचायत विकास आराखड्यातून निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. एका वर्गखोलीसाठी साडेआठ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असेही त्या म्हणाल्या.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!