Share

वर्णद्वेषाच्या ट्विटमुळे निलंबीत झालेल्या रॉबिन्सनच्या समर्थनासाठी अँडरसनचा पुढाकार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : इंग्लंड विरुद्ध न्युझीलंड दोन्ही संघात लॉर्ड्स येथे सुरु असलेला पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला आहे. आखेरच्या दिवशी न्युझीलंडच्या संघाने ६ बाद १६९ धावांवर डाव घोषीत केला. चौथ्या डावात इंग्लंड समोर २७३ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. पण दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडचा संघ ३ बाद १७० धावापर्यंत मजल मारु शकला. न्युझीलंडचा सलामीवीर डेवॉन कॉनवेला सामनाविराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

यादरम्यान इंग्लंडच्या संघाचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन हा ओली रॉबीन्सनच्या समर्थनासाठी पुढे आला आहे. ‘ ओलीने या प्रकरणात आधीच सर्वांची माफी मागितली आहे. त्याच्याकडे बघुन समजते की तो किती निराश आहे. एक संघ आणि एक सहकारी म्हणून ओलीचे कौतुक करतो कारण आता त्याच्या व्यक्तिमत्त्वात आता बदल झाला आहे. तो खूप परिपक्व झाला आहे. त्यामुळे त्याला संघाचा पूर्ण पाठिंबा आहे.’ असे अँडरसन म्हणाला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीती त्याने हे वक्तव्य केले.

या सामन्यात इंग्लंडकडून ओली रॉबीन्सन आणि जेम्स ब्रेसी यांनी पदार्पण केले. यात रॉबीन्सनने पदार्पणातच ७ गडी बाद करत चमक दाखवली. मात्र दुर्दैवाने २०१२-१३ मध्ये वर्णद्वेषी आणि लैंगिकतावादी ट्विटमुळे रॉबीन्सनचा पदार्पणाचा सामना हाच त्याचा अंतिम सामना ठरला. या प्रकरणात ब्रिटनचे क्रीडामंत्री ओलिवर डाउडेन यांनी हस्तक्षेप करत रॉबिन्सनला समर्थन दर्शवले होते. डायडेन यांच्यानंतर आता रॉबिन्सनचा सहकारी आणि इंग्ंलड संघाचा गोलंदाज जेम्स अँडरसन त्याच्या समर्थनासाठी पुढे आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!