Share

अन्  डोंगरकुशीतले ‘कळकराई’ प्रकाशले!

Published On: 

पुणे/ निशिकांत राऊत : कळकराई हे आंदर मावळातील अत्यंत दुर्गम, सह्याद्रीच्या डोगरांनी वेढलेले गाव. सुमारे दीड किलोमीटर खोल व अरुंद दरीत असणाऱ्या वीजवाहक तारा वादळी पावसामुळे तुटल्या अन् वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणचे कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ व धाडसी तरूणांनी अरुंद व खोल दरीत उतरून दुरुस्तीचे काम पूर्ण केले. त्यामुळे कळकराई गाव पुन्हा प्रकाशले व महावितरणच्या ग्राहकसेवेने ग्रामस्थ सुद्धा आनंदले.

मावळ तालुक्यातील कळकराई गाव हे खेड, मावळ व कर्जत तालुक्यांच्या सिमेवर आहे. कळकराईजवळील सावळा गावापर्यंत डांबरी रस्ता आहे. त्यापुढे सुमारे साडेतीन किलोमीटर डोंगराला वळसा घालत, धबधब्यांचे वेगवान प्रवाह ओलांडून जंगलातील अत्यंत खडतर पायवाटेने डोंगर पायथ्याशी असलेल्या 70 घरांच्या कळकराई गावात जाता येते. मावळकडे दळणवळणासाठी अत्यंत प्रतिकूल बिकटवाट आणि डोंगरदऱ्या असल्याने कळकराईमधील सर्व व्यवहार प्रामुख्याने कर्जतच्या बाजारपेठेत होतात. फक्त प्रशासकीय कामासाठी या गावाचा मावळ तालुक्याशी संबंध आहे. सन 2005 मध्ये कळकराई गावाजवळील डोंगरमाथ्यावर वीजयंत्रणेसह रोहित्र उभारण्यात आले. त्यास महावितरणच्या तळेगाव उपकेंद्रातून 22 केव्ही वाहिनीद्वारे वीज देण्यात आली. या रोहित्रापासून सुमारे दीड किलोमीटर अरुंद दरीमध्ये 5 ते 6 किलोमीटर लांबीच्या वीजतारा टाकून कळकराई गावाला वीजपुरवठा सुरु आहे.

 

Kalkarai Gaon Ta. Maval 02
कळकराई गावाचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी या डोंगरमाथ्याच्या बाजूने पायथ्यापर्यंत नवीन वीजतारा टाकण्यासह दुरुस्तीचे काम करण्यात आले.

हा वीज पुरवठा सुरळीत असतानाच जूनच्या पहिल्या आठवड्यात वादळ व मुसळधार पावसाने आंदरमावळात थैमान घातले. यामध्ये दरीत असलेल्या वीजतारा तुटल्या अन् कळकराई गावाचा वीजपुरवठा खंडित झाला. अतिशय खोल, अरुंद, कातळ पाषाण असलेल्या दरीमधील दुरुस्ती कामाचे खडतर आव्हान महावितरणसमोर होते. डोंगरावरील रोहित्रापासून ते पायथ्याशी असलेल्या कळकराई गावापर्यंत नवीन वीजतारा टाकणे आवश्यक होते. संततधार पाऊस असल्याने निसरड्या दरीत उतरणे शक्य झाले नाही. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी त्याही परिस्थितीत प्रयत्न केला पण दुरुस्तीचे काम शक्य झाले नाही.

कळकराई गावात महावितरणचे 55 वीजग्राहक आहेत. विशेष म्हणजे ते नियमित वीजबिलांचा भरणा करणारे आहे. या प्रामाणिक वीजग्राहकांना सेवा देण्यासाठी महावितरणकडून निसर्गाशी झुंज देत वीजपुरवठ्यासाठी प्रयत्न सुरु झाले. प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे, मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनीही कळकराईच्या वीजपुरवठ्याची माहिती घेतली तसेच दुरुस्तीच्या कामाबाबत मार्गदर्शन केले. अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार, कार्यकारी अभियंता प्रल्हाद खडके यांच्या नेतृत्वात दुरुस्तीच्या कामाला सुरवात झाली. नवीन वीजतारा आणि दुरुस्तीचे साहित्य डोंगराळ पायवाटेने नेण्यासाठीच सुमारे 4 ते 5 दिवस लागले, अशी त्या ठिकाणची नैसर्गिक स्थिती आहे. उपकार्यकारी अभियंता विजय जाधव, शाखा अभियंता श्याम दिवटे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून सहकार्याचे आवाहन केले.

त्यानंतर महावितरणचे प्रशिक्षित कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ व ठाकर समाजातील धाडसी तरूण आदी सुमारे 30 ते 35 जणांच्या पथकाने डोंगरमाथ्यावरून खोलदरीतून कळकराईपर्यंत वीजतारा ओढण्याचे काम सुरु केले. या जोखमीच्या कामात महावितरणचे अधिकारी धोका टाळण्यासाठी स्वतः देखरेख करीत होते. नवीन वीजतारा ओढणे व इतर महत्वाचे दुरुस्ती काम करण्यासाठी 5 दिवसांचा कालावधी लागला. कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता हे काम नुकतेच पूर्ण झाले. त्यानंतर सुरळीत वीजपुरवठ्याने कळकराई गाव पुन्हा प्रकाशले अन् ग्रामस्थांचे चेहरे सुद्धा आनंदाने उजळले. महावितरणचे अभियंते, कर्मचाऱ्यांचे व दुरुस्ती कामात सहकार्य करणाऱ्या धाडसी तरूणांचे ग्रामस्थांनी खुल्यादिलाने कौतुक केले.

मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मिळणार अखंड वीज

… अन्यथा कायदा हातात घेऊ – जितेंद्र आव्हाड

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!