Share

चाकोरी बाहेरची ‘चाकोरी’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : एक लेखक – दिग्दर्शक, सिनेमा अभ्यासक म्हणून आपलं जीवन वेगळय.पण एक माणूस म्हणून जीवनाकडे बघताना, त्याचे अनुभव घेताना आणि त्याची विविधांगी उकल करतांना एक नवीन दृष्टीतून हे सगळं पाहताना त्यात काय नवीन दिसतं.हे मांडत आहेत.लेखक – दिग्दर्शक, सिनेमा अभ्यासक अभिषेक पवार…फक्त ‘महाराष्ट्र देशा’ वर…

सकाळी सकाळी धडपडत घरी पोहोचलो. दाखवण्यासाठी सगळंं खुलं होतं. अमुक – तमुक म्हणजे सगळचं, एक चादर ओढून मी सुद्धा बसलो होतो. का ओढावीशी वाटते चादर माहित नाही.याची सगळी कारणं भूतकाळात शोधावी लागतील.प्रत्येक गोष्टीची कारणं ही भुतकाळात असतात आणि त्याचे परिणाम वर्तमानात दिसतात.या वेळी माझा भूतकाळ माझ्या पाठीमागे उभा राहून वर्तमानाशी ओळख करून देत होता.ओळख झाली खरी पण त्याच्या गोष्टी ठरलेल्या होत्या . चाकोरी बाहेरच्या गोष्टी मी करतो असं म्हणत असताना “चाकोरी बाहेरचं” अशी एक वेगळी चाकोरी बनते.

नदीला उगम असावा लागतो, हे पाणी कुठल्या नदीचं, कोणत्या प्रदेशातून वाहत आलं ,कोण – कोणते ओढे, नाले यामध्ये मिसळले ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतात. हे पाणी आहे आणि ओंजळभर पाणी काही काळ तुमची तहान भागवू शकेल असं म्हणून भागत नाही. लोक म्हणतात उगम सापडला म्हणजे सगळा प्रवाह लक्षात येतो.पण मला प्रश्न पडतो नदीला म्हणजे प्रवाहाला नेमका उगम असतो का? पाणी तर सगळीकडे आहे. पृथ्वीवर जमिनीपेक्षा पाणीच जास्त. ते काही ठिकाणी साठलेलं असत तर काही ठिकाणी वाहत. वाहत्या पाण्याला आपण प्रवाह म्हणतो, हा प्रवाह नक्की कुठे वाहत असतो ? शेवटी तो साठून एका ठिकाणी गोल होत असतो. हाच तो जीवनप्रवास…

महत्वाच्या बातम्या :

..त्यांना देव व मंदिर हाच पर्याय उपलब्ध आहे : अवधूत वाघ यांचा महाविकास आघाडीवर निशाणा

‘वारीत साप सोडण्याची अफवा करणारे म्हणतात मंदिर उघडा…’

सरकारच्या पदवी परीक्षेच्या चुकीच्या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!