दिल्ली : आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखला जाणारा पोर्तुगालचा स्टार स्ट्रायकर ख्रिस्तियानो रोनाल्डो आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पत्रकार सुचेता दलाल चर्चेत होत्या. याचे कारण होते त्यांनी केलेले एक ट्वीट आणि त्यानंतर अदानी कंपनीचे कोसळलेले शेअर. तसेच टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांच्या एका ट्विटनंतर बिटकॉईनचे भाव वाढले तर काही कंपन्याचे शेअर वाढले.
आता असाच अनुभव कोका कोला कंपनीला आहे. पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोलाने केलेल्या कृतीचा कोका कोला कंपनीला फटका बसला आहे. फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोलाने एका पत्रकार परिषदेत कोका कोलाच्या दोन बाटल्या हटवल्या आणि या कृतीचा फटका कोका कोला कंपनीला बसला आणि कंपनीचे 30 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
युरो कपचा गतविजेता पोर्तुगाल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत कोल्ड ड्रिंकच्या बाटल्या पाहून चिडला. त्याने आपल्या समो कोको कोलाच्या बाटल्या पाहून नाराजी व्यक्त केली. रोनाल्डोने रागात म्हटले की कोल्ड ड्रिंक नव्हे तर आपल्याला पाणी पिले पाहिजे असे त्याचे मत होते. परंतु रोनाल्डोच्या या २५ सेकंदाच्या कृतीनंतर कोका कोलाचे शेअर घसरण्यास सुरवात झाली. रोनाल्डोच्या या कृतीनंतर कोका कोलाचे अंदाजे 4 बिलियन डॉलर पर्यंत शेअर घसरले.
'Drink water'
Cristiano Ronaldo removes Coca-Cola bottles at start of #Euro2020 press conference pic.twitter.com/2eBujl9vzk
— Guardian sport (@guardian_sport) June 15, 2021
युरोपात दुपारी 3 वाजता शेअर मार्केट सुरू होते. त्यावेळी कोका कोलाच्या शेअरचा दर 56.10 डॉलर एवढा होता. अर्ध्या तासानंतर रोनाल्डोची पत्रकार परिषद झाली आणि त्यानंतर लगेच कोका कोलाचे शेअर घसरण्यास सुरुवात झाली. कोका कोलाचे शेअर 55.22 डॉलर पर्यंत पोहचले. त्यानंतर कोका कोलाच्या शेअरमध्ये चढ उतार सुरूच आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नियमावलीवरून मोदी सरकारशी पंगा घेणाऱ्या ट्विटरविरोधात पहिला गुन्हा युपीत दाखल
- ‘जे नियम पाळत नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याची धमक दाखवा’; अमेय खोपकरांचा सरकारवर निशाणा
- ‘माझ्या आजारपणाचा फायदा घेत काकांनी कट रचला’, चिराग पासवान यांचा आरोप
- ‘संभाजीराजेंनी आजचे आंदोलन मुख्यमंत्र्यांकडून चर्चेची वेळ मिळावी म्हणून केले होते का?’
- ‘खोटारड्या मोदी सरकारचा लोकांच्या जीवाशी खेळ; जीवापेक्षा मोदींचे प्रतिमा संवर्धन महत्वाचे आहे का?’

