मुंबई : नवरात्रीत स्त्री शक्तीचा जागर केला जातो. तसेच दुर्गामातेची आराधना केली जाते.नवरात्रीमधील सर्वात आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे, देवीचा जागर करण्यासाठी रात्री गरबा तसेच दांडिया खेळल्या जातात. अशातच मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने गरब्याचा एक अफलातून डान्स परफॉर्मन्स शेअर केला आहे. त्यास अनेकांनी पसंती दर्शविली आहे.
‘ नगाडा संग ढोल बाजे’ या गाण्यावर अमृताने सोशल मीडियावर तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने पिवळ्या रंगाची चोली आणि पांढऱ्या रंगाचा स्कर्ट घातला आहे. या गाण्यावर बेधूंद होऊन डान्स करताना दिसत आहे. तसेच तिच्यासोबत दोन बॅकग्राउंड डान्सर देखील दिसत आहेत. तिचा हा डान्स पाहून सगळ्यांना नवरात्रीच्या उत्सवात गेल्याची भावना नक्कीच येत आहे.
https://www.instagram.com/reel/CUtwothjPF5/?utm_medium=copy_link
सेलिब्रिटींमध्ये अभिनेत्री सोनाली खरे हिने ‘माईंड ब्लोईंग गर्ल,’ अशी कमेंट केली आहे. तसेच तिचे बाकी चाहते हार्ट तसेच फायर ईमोजी पोस्ट करत आहेत. अमृताच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. तिने ‘नटरंग’, ‘चोरीचा मामला’, ‘वेलकम जिंदगी’, ‘बाजी’, ‘वेल डन बेबी’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने ‘जीवलगा’ या लोकप्रिय मालिकेत देखील काम केले आहे. तिची ‘नटरंग’ या चित्रपटातील ‘वाजले की बारा’ ही लावणी खूप प्रसिद्ध झाली होती. मात्र नवरात्रनिमित्त शेअर केलेल्या या व्हिडिओमुळे सर्वांचे लक्ष वेधत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आर्यन खानला दिलासा नाहीच; न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला
- ‘..तर राष्ट्रवादी स्वबळावरही निवडणूक लढवू शकते’, शरद पवारांकडून मित्रपक्षांना कानपिचक्या
- सर्वधर्मीय धार्मिक स्थळांना भेटी देऊन मंत्री छगन भुजबळ यांची कोरोनामुक्तीसाठी प्रार्थना
- कोळसाटंचाईमुळे वीजनिर्मितीवर परिणाम; विजेचा अनावश्यक वापर टाळण्याचे महावितारांचे आवाहन
- … तर एकही चेंडू न खेळता मुंबई इंडियन्स आयपीएलमधून पडू शकते बाहेर


