Share

‘अमृता वहिनी म्हणजे संवेदनाहिन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन’

Published On: 

पुणे :महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद वरुन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आज महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. ‘कोणी मला सांगेल का आज वसूली चालू की बंद?’, असा खोचक टोला लगावत मिसेस फडणवीसांनी ठाकरे सरकारला लगावला होता. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

वहिनींच्या गाण्यात सुरांचा जसा ताळमेळ नसतो तसं त्यांच्या बोलण्यातही आजकाल काही ताळमेळ नसतो. संवेदनहीन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परपेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी, अशा खोचक शब्दात रुपाली चाकणकरांनी अमृता फडणवीसांना सुनावलं आहे.

दरम्यान, लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा निषेध म्हणून महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, औषधालये वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाविकास आघाडी सरकारनं पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. तर काही ठिकाणी या बंदला विरोधी पक्षाने तीव्र विरोध दर्शवत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार ताशेरे ओढले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!