Share

‘महाराष्ट्रातील वातावरण खराब,समाजात फिरताना असुरक्षित वाटतं’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई  : गेल्या अनेक दिवसांपासून धमक्या येत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन आपल्या सुरक्षेची मागणी केली आहे. तसेच भाजप सरकारच्या काळात सुरक्षेची मागणी करूनही आपल्याला सुरक्षा मिळाली नाही. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकारकडे सुरक्षेची मागणी करत असल्याचं अमोल मिटकरी यांनी सांगितलं आहे.

अमोल मिटकरी म्हणाले, “मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील वातावरण खराब झालं आहे. काही दिवसांपूर्वी अज्ञात मारेकऱ्यांनी प्रहारचे अकोल्याचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांना महाशिवरात्रीच्या दिवशी गोळ्या घालून मारलं. 7-8 दिवस उलटले आहेत, त्यातील एकाही आरोपीला अद्याप अटक झालेली नाही असं म्हणत त्यांनी एकप्रकारे पोलिसांच्या कार्यशैलीवर बोट ठेवले आहे .

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार,मागील काळात तत्कालीन सरकारविरोधात आम्ही बंड केला. फॅसिझमविरोधात जो जो बोलतो त्याला त्रास होतो. तशा काही गोष्टी आम्हाला जाणवल्या. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मी या सरकारकडे आणि गृहमंत्र्यांकडे सुरक्षेची मागणी केली आहे असं मिटकरी यांनी म्हटले आहे.

आम्ही जेव्हा समाजात फिरतो तेव्हा असुरक्षित वाटतं. दोन-तीन वर्षांपूर्वी धमकीचे फोन आणि मेसेजेस आले होते. त्यानंतर मी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील दिलं होतं. मात्र, त्यावर मागच्या सरकारच्या काळात काही कारवाई झाली नाही. आता हे महाविकासआघाडीचं सरकार आहे. पुरोगामी विचारांची पेरणी करणाऱ्या माणसांना हे सरकार सुरक्षा देईल, असा मला विश्वास आहे, असंही अमोल मिटकरी यांनी नमूद केलं.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!