🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रचाराची धुरा समर्थपणे पेलवली ती म्हणजे राष्ट्रवादीचे दोन अ’न’मोल रत्न अमोल मिटकरी आणि अमोल कोल्हे यांनी. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीतून जर प्रचारात कोणाला मागणी होती तर ती म्हणजे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे आणि अमोल मिटकरी यांना. आता याचीच बक्षिशी अमोल मिटकरी यांना मिळणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
‘मी जर ठरवलं तर कुणी आमदार होऊ शकत नाही,’ असं एका जाहीर सभेत अजित पवार बोलले होते. मात्र, आता त्यांनीच अमोल मिटकरी या राष्ट्रवादीच्या तरुण नेत्याला आमदार करणार असल्याची घोषणा केली. अमोल मिटकरीं यानंतर पक्षातील तरुण कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरल्याचे दिसून आले. अजित पवारांनी घोषणा केल्यामुळे मिटकरींना विधान परिषदेची दारे खुली झाली आहेत.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी राज्यभरात अमोल मिटकरींनी आपल्या भाषणांद्वारे राष्ट्रवादीच्या सभा गाजविल्या. राष्ट्रवादी-काँग्रेसचे उमेदवार ज्या ज्या मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरविण्यात आले होते, त्या सर्व मतदारसंघात जाऊन मिटकरींनी जाहीर सभा घेतल्या होत्या. एखाद दुसरी जागा सोडता मिटकरींच्या सभांचा चांगला परिणाम निवडणूक निकालातून दिसून आला.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1206118481877327872?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1206117202027433985?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
