टीम महाराष्ट्र देशा : येत्या विधानसभा निवडणुकी आधीचं राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठी गळती लागली आहे. अनेक नेत्यांनी खुंटलेल्या विकासाचा मुद्दा पुढे करत सत्ताधारी भाजपकडे धाव घेतली आहे. तर अनेक जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी पक्षाचं अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे अशा नाजूक परिस्थितीतून पक्षाला सावरण्यासाठी शिरूरचे खा. डॉ. अमोल कोल्हे पुढे सरसावले आहेत. तर राज्यात ‘शिवस्वराज्य यात्रा’ काढून ते पक्षाला बळ आणण्याचा प्रयत्न करणार आहेत.
त्याच पार्श्वभूमीवर आज खा. अमोल कोल्हे पुण्यातील युवासंवाद कार्यक्रमात बोलत होते. यावेळी खा.कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि बलाढ्य शक्तिशाली अफजलखानाचे उदाहरण देत भाजपला टोला लगावला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर देखील असेच संकट आले होते. अफजलखान सारखा बलाढ्य विध्वंसक राज्यावर चाल करून येत होता. अनेकांना अस्तित्वाची भीती दाखवून शरण येण्यास प्रवृत्त करत होता. मात्र अशा परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज डगमगले नाही. उलट त्यांनी दख्खनमधून येण्याऱ्या मोठ्या योद्ध्याला हरवण्याची संधी शोधली, असे म्हणत खा. कोल्हे यांनी आपण शिवाजी महाराजांचे मावळे आहोत याची तरुणांना आठवण करून दिली.
दरम्यान विधानसभा निवडणुका आता काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे राज्यातील प्रत्येक पक्षाने मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. असा निवडणुकीचा महत्वाचा काळ असताना राष्ट्रवादी पक्षावर मात्र संक्रात आली आहे. अनेक नेत्यांनी भाजपात पळ काढला आहे. त्यामुळे पक्षाची स्थिती खूपच नाजूक झाली आहे. अशावेळी पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी अमोल कोल्हे सक्रीय झाले आहेत. ते येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात शिवस्वराज्य यात्रा काढून जनतेला आवाहन करणार आहेत. तसेच खचलेल्या कार्यकर्त्यांना बळ देणार आहेत.
काका विरुद्ध पुतण्या : बीडमध्ये होणार महाराष्ट्रातील सर्वात लक्षवेधी लढत
मुख्यमंत्री राज्याचे दैवत म्हणून काम करतात – प्रसाद लाड
मोठी बातमी : राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचा भाजप प्रवेश रद्द

