Share

काका विरुद्ध पुतण्या : बीडमध्ये होणार महाराष्ट्रातील सर्वात लक्षवेधी लढत

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय पक्ष आता येत्या विधानसभा निवडणुकीची तयारी करू लागले आहेत. या विधानसभा निवडणुकीत राज्यात तिहेरी लढत पाहिला मिळणार आहे. तर बीड मतदारसंघात काका विरुद्ध पुतण्या अशी हायव्होल्टेज लढत पाहिला मिळणार असल्याचं दिसत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयदत्त क्षीरसागर यांनी बीडच्या स्थानिक राजकारणाला कंटाळून शिवसेनेत प्रवेश केला आहे. प्रवेश करताच राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावेळी क्षीरसागरांना युती सरकारकडून मंत्रिपद देखील देण्यात आले. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर हे बीड विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे प्रतिनिधित्व करणार आहेत. तर त्यांच्या विरोधात त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस उमेदवारी देणार असल्याच चर्चेत आहे. त्यामुळे बीड विधनासभा मतदारसंघात यंदा काका-पुतण्या असं राजकीय वॉर होणर असल्याच सांगितल जात आहे.

दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपेक्षाही राज्यात विधानसभा निवडणूक चांगलीच गाजणार असल्याचं दिसत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, शिवसेना-भाजप युतीबरोबरच आता वंचित बहूजन आघाडीही आपले उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार आहे.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!