🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : “सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन सुरु असलेली हिंसक निदर्शने दुर्दैवी आणि खूप त्रासदायक आहेत. वादविवाद, चर्चा आणि मतभेद हे लोकशाहीचे भाग आहेत. पण सरकारी मालमत्तेचं नुकसान करणं तसंच दैनंदिन आयुष्यात बाधा निर्माण करणं आपल्या नैतिकतेला धरुन नाही,” असं ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
मात्र मोदींनी केलेल्या या ट्विटवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जामिया विद्यापीठातील गोंधळासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांनी राजीनामा द्यावा, असे ट्विट केले आहे. याच ट्विटवर अंजली दमानिया यांनी प्रत्युत्तर देत थेट अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. “दिल्ली पोलिसांनीच सर्व गोंधळ घातला आहे. त्यांनीच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केलं आहे. या सर्व गोंधळासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच जबाबदार आहेत. त्यामुळे शहा यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा,” अशी मागणी दमानिया यांनी ट्विटवरुन केली आहे.
It is clearly the Delhi Police who has done havoc and damaged public property. The Home Minister is responsible for this chaos. Amit Shah should step down immediately
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) December 16, 2019
दरम्यान, नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर उत्तर भारतात संपूर्ण देशभरातून या कायद्याला विरोध करण्यात येत आहे. तर प. बंगाल व ईशान्येकडील राज्यांमध्ये या कायद्याच्या विरोधात तीव्र निषेध करत आंदोलनेही करण्यात आली. त्यानंतर देशभरात दिल्ली, उत्तर प्रदेश, लखनऊ, मुंबईसह देशभरातील विविध भागातील आंदोलनांनी हिंसक वळण घेतले आहे.
महत्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1206539971663843330?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1206539519031296001?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
