🕒 1 min read
लातूर : जिल्ह्यात सर्वच ठिकाणी पाणीटंचाई, बेरोजगारी, उद्योगधंदे बंद, वाढती सार्वजनिक अस्वच्छता, नाली, पथदिव्यांचा अभाव आहे. गेल्या पाच वर्षांत या मूलभूत प्रश्नांवर कोणतेच काम झाले नाही. सत्ताधाऱ्यांकडून फक्त आश्वासनांचा पाऊस पाडला गेला. हे विदारक चित्र सध्याचे वास्तव आहे. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी या सर्व मूलभूत प्रश्न सोडविण्यात सत्ताधाऱ्यांना आलेले अपयश नागरिकांना दाखवून द्यावे, हे असे आवाहन आमदार अमित देशमुख यांनी केले.
शहरातील कॉंग्रेसच्या बूथप्रमुख, कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. दोन कोटी वर्षाला रोजगार देतो म्हणून भाजप सरकारने युवकांची फसवणूक केली. उजनीचे पाणी लातूरला दिले नाही. शहरात प्रत्येक कार्यालयात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला जात आहे. मालमत्ता कर, नळपट्टी, वीजबिल, घरपट्टी यामध्ये भरमसाट वाढ केली जात आहे, अशा फसवणूक करणाऱ्या सरकारला घरी बसवा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी लातूर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष व्यंकट बेद्रे, शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोईज शेख, माजी आमदार वैजनाथ शिंदे, विक्रम हिप्परकर, अशोक गोविंदपूरकर, प्रा. माधव गादेकर, समद पटेल, झोन प्रमुख सूर्यकांत कातळे, पप्पू देशमुख, महादेव बरुरे, मोहन सुरवसे, डॉ. बालाजी साळुंके, सुपर्ण जगताप, नागसेन कामेगावकर, सचिन गंगावणे, संजय ओव्हळ, गोटू यादव, योजना कामेगावकर, शरद देशमुख, दत्ता सोमवंशी, सतीश साळुंके, धनंजय शेळके, रामभाऊ कोंबडे, आयुब मणियार, धर्मेंद्र शिंदे, सचिन पाटील (मंगरूळ), जितेंद्र स्वामी, सोमवंशी, रोहित दयाळ, चंद्रमणी कांबळे उपस्थित होते.
कूटनीतीचा वापर होईल, सावध राहा!
निवडणुकीच्या वेळी माझी बदनामी करणे, नाव ठेवणे, खोटे बोलणे, गैरसमज, अफवा पसरवल्या जातील, पेरल्या जातील. कारण माझ्यातील चांगले काही लोकांना सहन होत नाही, म्हणून ते माझ्याबद्दल वाईट सांगण्यास सुरवात करतील. यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी या आरोपांना बळी न पडता त्या आरोपाचे खंडण जनतेसमोर करावे. विरोधकांना नीतीने जिंकता येत नाही म्हणून ते कूटनीती वापरत आहेत. त्यामुळे प्रत्येक अडीअडचणीला मी स्वतः उपलब्ध राहणार आहे. कार्यकर्त्यांनी स्वतः मला फोन करून संबंधित शंकांचे निरसन करावे, असे आवाहन यावेळी देशमुख यांनी केले.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1177095842034900992?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1177095598824050688?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1177094377979564033?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

