Share

लातूर मनपाची बस सेवा विलासरावांच्या बाभळगावपर्यंत, अमित देशमुखांनी केला शुभारंभ

Published On: 

🕒 1 min read

लातूर: लातूर शहर महानगरपालिकेला शहर बस वाहतूक व्यतिरिक्त अतिरिक्त सहा ठिकाणी विस्तारित बस सेवा सुरू करण्यास राज्य परिवहन महामंडळाकडून ना हरकत देण्यात आलेली आहे. त्याअंतर्गत आज बांधकाम भवन तेथून गंजगोलाई ते गंगापूर विस्तारित शहर वाहतूक बससेवेचा शुभारंभ पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी अमित देशमुखांनी बसमधून प्रवास देखील केला. यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, महापालिका विरोधी पक्षनेते ॲड. दीपक सूळ यांच्यासह नगरसेवक व अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री अमित देशमुख यांनी महापालिकेच्या उपस्थित पदाधिकारी यांच्या समवेत बांधकाम भवन ते बायपास रोड पर्यंत शहर वाहतूक बस मधून प्रवास केला. या विस्तारित बस वाहतूक सेवेमुळे लातूर शहरालगतच्या प्रवाशांना शहरातून ये-जा करण्यासाठी फायदा होणार आहे त्यामुळे महापालिकेने लातूर शहरातील नागरिक व शहरालगतच्या नागरिकांना बस वाहतुकीची चांगली सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तरी प्रवाशांनी या बस सेवेला चांगला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

महापालिकेचे अधिकारी रुपनवर यांनी लातूर महापालिकेच्या वतीने गंजगोलाई ते बाभळगाव व गंजगोलाई ते गंगापूर ह्या दोन ठिकणी विस्तारित शहर बस सेवा आजपासून सुरू झाल्याची माहिती दिली. तर गंजगोलाई ते नांदगाव साई, कासारगाव, सोनवती व हरंगुळ या अन्य चार ठिकाणीही महापालिकेमार्फत विस्तारित बस सेवा लवकरच सुरू होणार आहे. नागरिकांच्या मागणीनुसार व प्रवासाच्या प्रतिसादा नुसार दैनंदिन किती फेऱ्या कराव्यात याबाबतचे प्रशासकीय स्तरावर नियोजन सुरू असून याचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!