Share

शास्त्रज्ञांनी शोधलेल्या ‘या’ तीन लक्षणांमुळे पाच दिवसातच कळणार कोरोना

Published On: 

🕒 1 min read

पुणे : चीनच्या वूहान शहरातून आलेला कोरोना व्हायरसने आता जगभरात दहशत माजवली आहे. संपूर्ण जगभरात या व्हायरासमुले चिंतेचे वातावरण आहे. चीननंतर इटली, फ्रान्स, इराण, दुबई सारख्या देशांमध्ये हजारोंचे बळी गेले आहेत. भारतातही या व्हायरसने वेगाने शिरकाव केला असून आता भारतात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 300हून अधिक झाली आहे. यातच शास्त्रज्ञांना कोरोनाची नवी लक्षणे सापडल्यामुळे 14 दिवसांत समजणारा कोरोना आता 5 दिवसांत समजत आहे.

संपूर्ण जगात या प्राणघातक व्हायरसची लागण झालेल्या लोकांची संख्या दोन लाखांच्या पुढे गेली आहे. अमेरिकन संशोधकांनी प्रसिद्ध केलेल्या इंटर्नल मेडिसीनच्या जर्नलच्या अहवालानुसार, पहिल्या पाच दिवसात कोरोनाची तीन विशिष्ट लक्षणे आढळतात. यात हा अहवाल सांगतो, की कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर पहिल्या 5 दिवसांत एखाद्या व्यक्तीला कोरडा खोकला येणे सुरू होतो. हे कोरोनाचे पहिले लक्षण आहे.त्यानंतर रुग्णाला जास्त ताप येऊ लागतो आणि त्याच्या शरीराचे तापमान खूप वाढते. आतापर्यंत अनेक आरोग्य तज्ञांनी कोरोना विषाणूचा उच्च ताप असल्याचा दावा केला आहे. तसेच, एखाद्या व्यक्तीला पहिल्या 5 दिवसात श्वास घेण्यासाठीही त्रास होतो.

या अहवालामुळे, कोरोनाची विषाणूची लक्षणे समजण्यासाठी आता 5 दिवसांचा कालावधी पुरेसा असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे शरीरात ही 3 लक्षणे दिसल्यानंतर कोरोना विषाणूचा धोका लवकर समजण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे, कोरोनामध्ये समान लक्षणे असल्याचा दावा राष्ट्रीय आरोग्य केंद्र (NHS) आणि जागतिक आरोग्य संघटनेनेही केला.

यामध्ये शरीरावर वेदना, सर्दी यासारख्या समस्याही सांगितल्या गेल्या. हे संशोधन चीनमधील वुहान शहरातील सुमारे 50 संशोधकांनी केले आहे. यावेळी, आरोग्य तज्ञांनी देखील 14 दिवस लोकांना अलिप्त राहण्याचा सल्ला दिला आहे. अहवालात असेही म्हटले आहे की कोरोना विषाणूसारखी लक्षणे ही सामान्य सर्दी, फ्लू, संसर्ग किंवा न्यूमोनियासारखेच असतात.\

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!