टीम महाराष्ट्र देशा- सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या चेरापुंजी बरोबरच चारशे इंच पाऊस पडणाऱ्या मेघालयातल्या मौसिंरामला देखील आंबोलीन यावर्षी मागे टाकलं आहे. गेल्या 25 वर्षातला हा उचचांक असून यंदा आंबोलीत सव्वाशे इंच पाऊस जास्त पडलाय.
हा खरतर विश्वविक्रम आहे. यावर्षी जूनमध्ये 40 इंच तर जुलैच्या दोन आठवडे पाऊस अगदीच कमी होता. मात्र जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसान झोडपून काढलं आणि ऑगस्ट मध्ये तर पावसानं जोर मारून रेकॉर्ड केलं. अर्थात अति पावसाचा फटका आंबोलीतल्या हॉटेल व्यावसायिक, शेतकरी आणि वर्षा पर्यटनाला सुद्धा बसला. पण आंबोलीत अनेक वर्षानंतर असा जागतिक विक्रम करणारा पाऊस यावर्षी झाला हे मात्र खरं.
तर दुसऱ्या बाजूला यंदा पावसामुळे मोठे नुकसान झाल्याचे पाहयला मिळत आहे. पुणे विभागात अतिवृष्टीमुळे 1 लाख 89 हजार हेक्टर क्षेत्र बाधीत झाले असून काल सकाळपर्यंत 90 हजार हेक्टरवरील पिकाचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. येत्या दोन दिवसात सर्व बाधीत क्षेत्राचे पंचनामे पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी काल दिली.
डॉक्टर म्हैसेकर यांनी काल पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागातील पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांना विमा कंपन्याकडून भरपाई मिळण्यासाठी अडचण येऊ नये यासाठी जिओ टॅगिंगचा वापर करून छायाचित्रं काढून पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1192376546582908930?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1192373018636369921?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

