Share

‘आरएसएस’च्या शिलेदाराला वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी ?

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर यांना सांगलीची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. अशातच आता पडळकर हे संभाजी भिडे यांचे कट्टर समर्थक असल्याची छायाचित्रे सोशल मिडीयावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहेत. एवढेच नाही तर, पडळकर यांनी भिडे यांना ११ लाख रुपयांची मदत केल्याचा संदेशही सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. यामुळे गोपीचंद पडळकर हे उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीच मोठ्या अडचणीत आले आहेत.

प्रकाश आंबेडकर हे आरएसएस आणि भिडे गुरूजींचे कट्टर विरोधक मानले जातात. भीमा कोरेगाव दंगलीप्रकरणात भिडे गुरूजी यांना अटक करण्याच्या मागणीसाठी आंबेडकर यांनी तीव्र आंदोलन केले होते. आंबेडकरी जनतेमध्येही भिडे यांच्याविषयी तीव्र संताप आहे. दरम्यान, भिडे यांच्यासोबत पडळकर यांचे खाक्या रंगाच्या अर्ध्या विजारातील छायाचित्रे दिसत आहेत.

तर अशात कट्टर संभाजी भिडे भक्त अशा अवतारातील पडळकर यांची ही छायाचित्रे पाहिल्यानंतर आता प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आरएसएस विरोधी भूमिका घेणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांच्या पडळकर यांना उमेदवारी देण्याच्या निर्णयाने वंचित बहुजन आघाडीमधील बरेच कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज असल्याचे चित्र राज्यभर पाहायला मिळत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!