चेन्नई : काल अनेक दिग्गज खेळाडूंचा लिलाव झाला तर काही खेळाडू ‘अनसोल्ड’ म्हणजेच विकले गेले नाहीत. क्रिकेटविश्वावर अधिराज्य गाजवणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आयपीएलच्या १४ व्या हंगामात खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. सचिन तेंडुलकचा सुपुत्र पहिल्यांदाच आयपीएल लिलावात सामील होणार असल्याने अनेक क्रिकेट रसिकांच्या त्यांच्या लिलावाकडे लक्ष्य लागलं होतं.
अखेर अर्जुनवर बोली लागली. मुंबई इंडियन्सनेच त्याच्यावर बोली लावत २० लाखांमध्ये त्याला खरेदी केलं आहे. दरम्यान, विशेष बाब म्हणजे आयपीएलच्या इतिहासात सर्वात मोठी बोली आज लावली गेली. दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू क्रिस मॉरिस याच्यासाठी तब्बल १६.२५ कोटी रुपयांची बोली लावण्यात आली आहे. केवळ ७५ लाख इतकी बेस प्राईज असलेल्या मॉरिस साठी १६.२५ कोटी मोजण्यात आले आहेत. आयपीएलच्या इतिहासात लिलावामध्ये सर्वात मोठी बोली लावलेली ही किंमत आहे. १६.२५ कोटी रुपये मोजत राजस्थान रॉयल्सने आपल्या ताफ्यात जमा केलं आहे. पहिल्यांदाच आयपीएलमध्ये संधी मिळाल्याने आणि मुंबईसारख्या तगड्या संघाने खरेदी केल्यानंतर अर्जुन तेंडुलकरही चांगलाच आनंदात आहे.
अर्जुन तेंडुलकरच्या कौशल्याचे MIचे मालक आकाश अंबानी यांच्याकडून कौतुक
”अर्जुनकडे कौशल्य आहे. तो डावखुरा जलदगती गोलंदाज आणि डावखुरा फलंदाजही आहे. जगात असे फार कमी क्रिकेटपटू आहेत, परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे अन्य युवा खेळाडूंप्रमाणे त्याची प्रगती होत गेली आहे. मुंबई इंडियन्स त्याला आणखी सहकार्य करेल, अर्जुनलाही त्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. ज्या प्रकारचे वातावरण मुंबई इंडियन्सच्या कुटुंबात आहे, त्याचा अर्जुनला फायदाच होईल. अन्य युवा खेळाडूंप्रमाणे आगामी काळात अर्जुनही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करेल, अशी आशा आहे,”असे आकाश अंबानी म्हणाले.
https://www.instagram.com/p/CLcWmKnDP55/?utm_source=ig_web_copy_link
https://www.instagram.com/tv/CLdd5XAqS1_/?utm_source=ig_web_copy_link
महत्वाच्या बातम्या
- तरुण शेतकऱ्यांनी नवीन पीक पद्धती स्विकारून शेतीत क्रांती घडवावी : रावसाहेब दानवे
- बाबा रामदेव यांचा रामबाण उपाय;तीन दिवसात कोरोनाचा रुग्ण बरा होण्याचा दावा
- ‘राजे’ तुमच्या विचारांचे पालन करणार, चिमुकल्यांचा शिवजयंती दिनी निर्धार
- ‘स्मार्ट’ खेचाखेची, सीईओपदी राहणार कोण? पांडेय की मनोहरे
- जूही चावलाने शेअर केला शारूखचा मुलगा आर्यन आणि मुलगी जान्हवीचा फोटो, लिहिला खास संदेश


