🕒 1 min read
मुंबई : शिवसेना खा. संजय राऊत यांच्या राजभवनाबाबतच्या ट्विटनंतर ते पुन्हा चर्चेत आले आहेत.त्यांनतर कितीही डावपेच खेळले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच 27 मे नंतरही राज्याचे मुख्यमंत्री असतील, असा ठाम विश्वास आता संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
tv9 मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना संजय राऊत यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, सध्याची परिस्थिती ही संघार्षाची आहे. कोरोनाच्या संकटात सर्वांनी राजकीय मतभेद विसरून लढलं पाहिजे. मी जे राजभवनाबाबत ट्विट केले ते वाचनात आलेल्या घटनांवरून केले. राजभवन हे खूप पवित्र स्थान आहे. त्याचं पावित्र्य टिकून राहिला पाहिजे यासाठी मी त्याबाबत ट्विट केले.
तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 27 मे पर्यंत कोणत्याही सभागृहाचे सदस्य होणे आवश्यक आहे. त्यांच्या सदस्य होण्याच्या प्रक्रियेत कोणी आडकाठी करत असली तरी 27 मे नंतरही उद्धव ठाकरेचं हे राज्याचे मुख्यमंत्री असणार आहेत, असे संजय राऊत म्हणाले.
तर मुख्यमंत्र्यांच्या विधान परिषदेचे सदस्य होण्याच्या प्रक्रियेत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी काही अडचण निर्माण करत आहेत का ? असे विचारले असता यावर संजय राऊत यांनी स्पष्ट नकार दिला आहे. भगतसिंग कोश्यारी हे सदगृहस्त आहेत, सदाचारी आहेत, अनुभवी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर माझा आक्षेप नाही, असे संजय राऊत म्हणाले.
राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये.
का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे.
समझने वालों को इशारा काफी है!— Sanjay Raut (@rautsanjay61) April 19, 2020
दरम्यान संजय राऊत यांनी राजभवनाबाबत ट्विट केले होते. त्यात त्यांनी असे लिहिले होते की, राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. समझने वालों को इशारा काफी है!
बाळासाहेबांच्या जिवलग ‘सामना’बद्दल या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
