Share

पोस्ट आणि बँक कर्मचाऱ्यांना मुंबईत लोकल प्रवासाला परवानगी द्या- भाजपा

Published On: 

मुंबई : लॉकडाऊन दरम्यान पोस्ट आँफिस आणि बँकेचे व्यवहार भारताच्या आर्थिक राजधानी मुंबईत अखंडितपणे सुरू असून मुंबई उपनगरीय रेल्वे गाड्यांमधून इंडिया पोस्ट आणि बँक कर्मचाऱ्यांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र आज भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लिहिले आहे.

मुंबई अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी रेल्वेची लोकल सेवा सुरू करण्यात आली असून यामध्ये पोस्ट ऑफिस आणि बँक कर्मचाऱ्यांना परवानगी देण्यात आलेली नाही. याबाबत भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता आणि रेल्वेशी संपर्क साधला असता याबाबतची परवानगी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात येते असे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे तातडीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून या दोन्ही सेवेतील कर्मचाऱ्यांना मुंबईत रेल्वेचा लोकल प्रवासाची परवानगी द्यावी अशी विनंती आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

लाँगडाऊन काळात बँकांनी आपले व्यवहार नियमित सुरु ठेवले असून त्यासोबत पोस्टाने ही विविध टपाल सेवा, पेंशन, वैद्यकीय साधनांची ने-आण या कार्यात मोठा सहभाग नोंदवला आहे. या लाँगडाऊन काळात ज्येष्ठ नागरिक पेन्शन व केंद्र शासनाकडून देण्यात आलेली आर्थिक मदत सुमारे 590 कोटीची मदत घरोघरी पोहचवण्याचे काम बँक व पोस्टाने केली. मुंबई या.सेवेत असणारे कर्मचारी उपनगर व आजूबाजूच्या परिसरात राहत असून त्यांना प्रवासाला उपनगरीय रेल्वे सेवेत परवानगी देणे आवश्यक असून अधिक संख्येने हे कर्मचारी त्यामुळे हजर होऊ शकतील म्हणून ही परवानगी देण्यात यावी, अशी विनंती आमदार अँड आशिष शेलार यांनी केली आहे.

केजरीवाल तुमच्या राज्यात ‘वाय-फाय’ कुठ मिळणा;अमित शहा

अमेरिकन आयोगाने केली केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर निर्बंध लादण्याची मागणी

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून टाक्स फोर्स नियुक्त करा : भाजपा

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!