Share

केजरीवाल तुमच्या राज्यात ‘वाय-फाय’ कुठ मिळणा;अमित शहा

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: निवडणूक आयोगाकडून आज दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली.आठ फेब्रुवारी रोजी हि निवडणूक होणार आहे.राजकीय पक्षांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची तयारी सुरु केली आहे.यातच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील विकासाच्या नावाखाली लोकांच्या डोळ्यात धूळ फेकल्याचा आरोप भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे.अमित शहा म्हणाले कि अहो,केजरीवाल तुमच्या राज्यात शोधून-शोधून थकलो, तरी मला वाय – फाय मिळाल नाही.वायफाय शोधता-शोधता लोकांच्या फोनमधील बॅटरी संपून जाते. पण, वायफाय काही मिळत नाही.

राजधानी दिल्लीत आज एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमात संबोधित करताना अमित शाह यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारवर हल्लाबोल केला. केजरीवाल यांनी दिल्लीत पंधरा लाख सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे सांगितले होते. पण हे कॅमेरे मला कधी दिसले नाहीत.कॅमेरे कुठे लावले आहेत, याचा शोध दिल्लीतील जनता घेत आहे.असे सांगत गृहमंत्री अमित शाह यांनी केजरीवाल सरकारवर निशाणा साधला.

दिल्लीत पाच वर्षांऐवजी पाच महिन्याचे सरकार चालले आहे. पाच वर्षात अरविंद केजरीवाल सरकारने काहीच केले नाही. फक्त गेल्या महिन्यात जाहिरातबाजी करून दिल्लीतील जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम केले, असा आरोप अमित शाह यांनी केला. सोबतच निवडणुकीच्या तोंडावर अरविंद केजरीवाल सरकारने घोषणा केल्याचा आरोप अमित शाह यांनी केला आहे.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!