Share

‘दिवसातून काही तास का होईना मद्यविक्रीची परवानगी द्यावी’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशात लॉक डाऊन जाहीर केलं आहे. यामुळे सर्वांनाच असुवेधेचा सामना करावा लागत आहे. लॉकडऊनमुळे अनेक दिवसांपासून वाईन शॉप आणि बार बंद आहेत. निदान दररोज ठराविक वेळासाठी का होईना वाईन शॉप उघडण्याची परवानगी सरकारने द्यावी अशी मागणी दुकानदारांकडून होत आहे. मात्र एकूणच परिस्थिती लक्षात घेता सध्या तसं करणं शक्य नसल्याचं राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

याबाबत मद्याची दुकानं पूर्णवेळ उघडी ठेवू द्या अशी आमची मागणी नाही पण समजा तीन ते चार तास जरी दुकाने उघडी ठेवायची परवानगी मिळाली तरी फायदा होईल, असं महाराष्ट्र वाईन मर्चंट असोसिएशनचे चेअरमन दिलीप गियानानी यांनी म्हटलं आहे. याबाबतच वृत्त ‘थोडक्यात’ या वृत्त संकेतस्थळाने दिलं आहे.

मद्य पिणाऱ्या अनेकांना आता विड्रॉल सिम्पटमचा त्रास होऊ लागलेला आहे. तर दुसरीकडे काळया बाजारात मद्याची विक्री होत आहे. या सगळ्याचा परिणाम सरकारच्या महसुलावर होतो आणि सामाजिक प्रश्न सुद्धा निर्माण होतात, असं गियानानी यांनी नमूद केलं आहे.

आम्ही याबाबत राज्य उत्पादन शुल्क खात्याशी या विषयावर अनौपचारिकरीत्या संवाद साधला आहे आणि त्यांच्या निर्णयाची वाट पाहत आहोत, असं गियानानी म्हणाले आहेत.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!