🕒 1 min read
औरंगाबाद: राज्यात सर्वत्र पावसाने कहर केलेला असताना, धरणे तुडुंब झालेली असताना मराठवाड्यातील चित्र मात्र अजुनही वेगळेच आहे. या भागात गेल्या आठ दिवसांपासून सक्रीय झालेल्या पावसामुळे काहीसा आधार मिळाला असला तरी तीन प्रकल्पांचा अपवाद सोडला तर बरेच जलप्रकल्प कोरडेच आहेत.
नाशिक, नगरहून येणाऱ्या पाण्यामुळे जायकवाडी शंभर टक्के भरले आहे. जायकवाडीतून पाणी सोडल्याने गोदावरी नदी खळाळत आहे. नांदेडचे विष्णुपुरी व मानार प्रकल्पही भरले आहेत. दरम्यान, सक्रिय झालेल्या पावसाचा जोरही ओसरला आहे.
मोठ्या अकरा प्रकल्पांत सरासरी 53.63, मध्यम 75 प्रकल्पांत 19.11, सुमारे साडसातशे लघु प्रकल्पांत 17.62, गोदावरी नदीवरील 13 बंधाऱ्यांत 67.20 तर तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील 23 बंधाऱ्यांत केवळ दोन टक्के जलसाठा आहे. सर्व प्रकल्पांत मिळून सरासरी 42.22 टक्के जलसाठा आहे. आकडेवारी ही सरासरीची असली तरी बरेच प्रकल्प कोरडेच आहेत.
मराठवाड्यातील धरणांची स्थिती
जायकवाडी : 100 टक्के
निम्न दुधना : -16.95
येलदरी : 5.58
सिद्धेश्वर : -21.03
माजलगाव – -12.30
मांजरा – -24.30
पेनगंगा – 36.68
मानार – 99.18
निम्न तेरणा – 13.36
विष्णुपुरी- 79.94
सीना कोळेगाव – -90.30
शहागड बंधारा – शून्य
खडका बंधारा – शंभर टक्के
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1178212298281799680?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1178212663416868864?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
