🕒 1 min read
मुंबई : अभिनेत्री स्वरा भास्कर अभिनयापेक्षा तिच्या वक्त्यव्यामुळेच जास्त चर्चेत असते. स्वरा सोशल मिडीयावर अधिक सक्रीय असून अनेक विषयाबाबत ती आपले मत मांडत असते. यावरून तिला अनेकदा ट्रोल करण्यात येते. सध्या क्रुझवरील अमलीपदार्थांच्या पार्टीप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खानबाबत केलेले एक ट्विट चर्चाचा विषय ठरत आहे.
नुकतेच स्वराने केलेल्या ट्वीटमध्ये म्हंटले की, ‘चांगले वर्तन कसे असावे याचे शाहरुख खान एक उदाहरण आहे. माझ्यासाठी, एक आदर्श व्यक्ती म्हणून त्याच्याकडे सर्व गुण आहेत. वैयक्तिकरित्या तो माझ्यासाठी प्रेरणाही आहे. त्याच्यासाठी आणि गौरीसाठी मी प्रार्थना करत आहे’ या आशयाचे ट्वीट स्वराने केले आहे.
२ ऑक्टोबर पासून अटकेत असलेल्या आर्यनच्या सुटकेसाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. मात्र त्याला अद्याप जामीन मिळाला नाही. सध्या आर्यन आर्थर रोड तुरुंगात असून काल शाहरुख खान सकाळी आर्यनला भेटण्यासाठी पोहोचला होता. गेल्या १७ दिवसापासून आर्यन अटकेत असून त्याच्या सुटकेसाठी अनेक प्रयत्न केले जात आहे. मात्र अद्याप त्याची सुटका झाली नाही. दरम्यान, याप्रकरणी बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी शाहरुखला पाठिंबा दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी आठ तास अखंडीत वीज द्या, अन्यथा रास्तारोको आंदोलन करू’
- ‘मुंबई मनपाच्या पैशांचा शिवसेनेकडून पक्षनिधी म्हणून वापर’, बाळा नांदगावकर यांचे आयुक्तांना पत्र
- डोनाल्ड ट्रम्प स्वतःचं सोशल मीडिया नेटवर्क करणार लाँच
- ‘तुमच्याकडे ना हिंदुत्व, ना धर्म! आहे ते फक्त हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळवलेले मुख्यमंत्रिपद’
- भारताने सर्वांत कमी कालावधीत १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पार केला-पंकजा मुंडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
