औरंगाबाद : आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच देशांतर्गत कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव व प्रसार यात झपाट्याने वाढ होत असुन कोरोना विषाणुमुळे होणार COVID-19 आजाराबाबत औरंगाबाद जिल्ह्यांत दक्षता घेण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. सद्यस्थितीनुसार औरंगाबाद जिल्ह्यात 1 रुग्ण कोरोना बाधीत आढळले असुन त्या अनुषंगाने कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या उद्देशाने उचित पावले उचलणे आवश्यक आहे.
जगातील इतर देशामधील अनुभव लक्षात घेता, कोरोना विषाणुचा संसर्ग चक्राकार पध्दतीने (EXPONENTIAL) पसरतो या अनुभवाच्या आधारे कोरोना विषाणुचा संसर्ग कमी करण्याकरीता Social Distancing व्यक्तीमध्ये भौतिक दृष्ट्या कमीत कमी संपर्क यावा व शक्यतो घरात राहणे आवश्यक आहे. कोरोनाच्या बाधीत रुग्णांचे वाढती संख्या पाहता कोरोना विषाणुचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोना या विषाणुचा अधिक वाढ होऊ न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाय योजना आखणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व अबकारी अनुज्ञप्त्यांमध्ये मद्य प्राशन करणाऱ्या ग्राहकांची होणारी गर्दी लक्षात घेता कोरोना विषाणुचा संसर्ग होवून मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होवून जिवीतहानी होण्याची शक्यता आहे.
तरी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व मुंबई मद्द निषेध कायदा, 1949 चे कलम 142 (1) अन्वये संपुर्ण औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व देशी मद्द किरकोळ विक्री अनुज्ञप्ती (सीएल-3), विदेशी मद्द व बिअरची किरकोळ विक्री अनुज्ञप्ती (एफएल-2, एमएल-3, व एफएल-4, ई बार), बिअर विक्री किरकोळ विक्री अनुज्ञप्ती (एफएल-बीआर/2) तसेच एफएल-1/सीएल-2 या अनुज्ञप्ती दि.20 मार्च 2020 रोजी सायंकाळी 6.00 वाजेपासून ते दिनांक 31 मार्च 2020 रोजी पर्यंत संपूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेशीत करण्यात येत आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास संबंधीत विरुध्द महाराष्ट्र मद्द निषेध कायदा, 1949 चे कलम 54 व 56 अन्वये कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

