पुणे : पुण्यातील एसपी कॉलेजमध्ये विविध डेज साजरे करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. रोझ डे, चॉकलेट डे असे सर्वच डेज साजरे करण्याला एसपी कॉलेज प्रशासनानं बंदी घातली आहे. मात्र आता महाविद्यालयानं घातलेल्या या बंदीमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही एसपी कॉलेजमध्ये 16 ते 26 जानेवारी दरम्यान रोझ डे, चॉकलेट डे, फ्रेण्डशिप डेजसह इतर डेज् साजरे केले जाणार होते. पण कॉलेज प्रशासनाने पत्रक काढत डेज् साजरे न करण्याची नोटीस विद्यार्थ्यांना दिली आहे. डेज् साजरे करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कॉलेज प्रशासनाने डेज् साजरे करण्यावर बंदी घातली आहे.
कॉलेजच्या पंटागणात कोणताही डेज् विद्यार्थांनी साजरा करु नये. जर केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असं विद्यार्थ्यांनी आपल्या नोटीसमध्ये म्हटलं आहे.महाविद्यालयाबाहेरील घटकांकडून महाविद्यालयाच्या आवारात डे साजरे करण्यात प्रयत्न होतो. त्यामुळे महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण बिघडू शकतं. महाविद्यालयातील वातावरण आणि सुरक्षितता कायम राहण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं डॉ. शेठ यांनी म्हटलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

