Share

पीएमसी बॅंकेवरील निर्बंधांमुळे १५ हजार पगारदार संस्था, आणि पतसंस्था अडचणीत

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा:-पीएमसी बँकेवर आर्थिक निर्बंध आल्याने, सहकार क्षेत्रातील पगारदार संस्था, छोटय़ा पतसंस्था, सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अगदी काही नागरी सहकारी बँकां अडचणीत आल्या आहेत. एकाच प्रकारच्या कर्जखात्यात अनेक नियमभंग केल्याची कबुली पीएमसी बँक व्यवस्थापनानेच रिझर्व बँकेला दिली असल्याची माहिती मिळाली आहे.

आरबीआय ने बँकेवर लादलेल्या निर्बंधांच्या कारवाईचा त्रास बँकेतील ठेवीदारांना होत आहे. त्यामुळे लहान ठेवीदारांना गुरुवारी बँकेतील खात्यातून १० हजार रुपयांपर्यंत रक्कम काढण्याची सवलत देण्यात आली असली तरी मोठ्या रकमेच्या ठेवीदारांना याचा काहीही फायदा होणार नाही असे दिसून आले आहे. बँकिंग नियमन कायद्यानांतर्गत आरबीआय ने निर्बंध लादले आहेत. मात्र यात रिझर्व बँकेच्याच अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या निर्बंधाचा फटका मोठ्या अधिकाऱ्यांनाच जास्त बसणार आहे.‘रिझर्व बँक ऑफिसर्स को-ऑप क्रेडिट सोसायटी’ची पीएमसी बँकेतील मार्च २०१९ अखेर मुदत ठेवीत गुंतलेली रक्कम १०५ कोटी रुपयांची आहे.

त्याचप्रमाणे पीएमसी बँकेत एकूण ९.१६ लाखांपर्यंत खातेधारक आहेत. ज्यात मुंबई आणि राज्यभरातील सुमारे १५ हजार पगारदार पतसंस्था आणि सहकारी गृहनिर्माण संस्था ठेवीदारांचा समावेश आहे. तसेच १७५४ लघु कार्यक्षेत्राशी निगडीत सहकारी पतसंस्था आणि सोसायटय़ांची खाती आहेत. तर २१६ नागरी सहकारी बँकांनी या बँकेत काही ना काही ठेवी राखल्या आहेत. आर्थिक वर्ष मार्च २०१९ अखेर २० हजार कोटी रुपयांचा व्यवसाय असलेल्या पीएमसी बँकेकडे ११,५०० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या ठेवी आहेत. गुरुवारी खात्यातून कमाल १० हजार रुपये काढण्याच्या सवलतीचा ६० टक्के ठेवीदारांना दिलासा देणारा लाभ मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1177920996189171713?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1177921196542722048?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!