Share

मुंबई पोलिसांसाठी अक्षय कुमार पुन्हा सरसावला ; दिले मनगटावर बांधणारे १ हजार बॅण्ड

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोना व्हायरसनं जगभरात हाहाकार माजवला आहे. भारतातही करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या ओढावलेल्या करोनाच्या संकटातून मार्ग काढण्यासाठी सामान्य नागरिकांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण शक्य होईल तशी मदत करत आहे.

अभिनेता अक्षय कुमारने सातत्याने त्याच्या मदतीचा हात पुढे केला आहे. आतापर्यंत अक्षयने विविध मार्गांनी करोनाग्रस्तांना, महानगर पालिकेला , गरजुंना मदत केली आहे. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे केला आहे.

टाइम्स ऑफ इंडिया’नुसार, अक्षयने मुंबई पोलिसांना सेन्सॉर असलेले १ हजार मनगटावर बांधायचे हेल्थ बॅण्ड पुरवले आहेत. या बॅण्डच्या मदतीने पोलिसांच्या शरीराचं तापमान तपासता येणार आहे. मनगटावर बांधण्यात येणाऱ्या या बॅण्डमुळे पोलिसांच्या शरीराचं तापमान, हृदयाचे ठोके, रक्तदाब, कॅलरी या सगळ्या गोष्टी तपासता येणार आहेत. सध्याच्या काळात पोलीस अहोरात्र काम करत असून बऱ्याच वेळा ते त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या काळजीसाठी अक्षयने हे बॅण्ड पुरविल्याचं म्हटलं जात आहे.

मोदींच्या ‘आत्मनिर्भर’ पॅकेजला वर्ल्ड बँकेकडून मदत : एक अब्ज डॉलर पॅकेजची केली घोषणा

दरम्यान, अक्षय सातत्याने त्याला शक्य होईल त्या पद्धतीने मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी त्याने पंतप्रधान केअर फंडमध्ये २५ कोटी रुपयांची रक्कम केली आहे. तर मुंबई महानगरपालिकेला तीन कोटी रुपयांची रक्कम डॉक्टरांच्या पीपीई (Personal protective equipment), मास्क आणि रॅपिड टेस्ट किट खरेदीसाठी दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या घरी कोरोना, न्यायाधीश कुटुंबासहित सेल्फ क्वारंटाइन

‘या’ अभिनेत्याने कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी दिले 36 रुमचं संपूर्ण हॉटेल, क्वारंन्टाईनसाठी मदत

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!