🕒 1 min read
मुंबई: सध्या बॉलीवूडमध्ये हेरा फेरी 3 (Hera Pheri 3) बद्दल रोज काही ना काही माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर अक्षय कुमार (Akshay Kumar) हेरा फेरी 3 मध्ये दिसणार नसल्याने या चर्चा अधिकच वाढल्या आहेत. तर दुसरीकडे अक्षय कुमार हेरा फेरी च्या तिसऱ्या भागांमध्ये नसल्याने त्याचे चाहते नाराजी व्यक्त करत आहे. अशा परिस्थितीमध्ये हेराफेरी मधील मुख्य अभिनेता सुनील शेट्टी (Sunil Shetty) याने अक्षय कुमारच्या चित्रपटातील उपस्थितीबद्दल वक्तव्य केले आहे.
हेरा फेरी फ्रेंचायझी सोबत अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांचा खूप जुना संबंध आहे. अशा परिस्थितीत अक्षय कुमारचे या चित्रपटातून नाव काढणे हे थोडेसे धक्कादायक होते. दरम्यान, नुकत्याच एका मुलाखतीमध्ये या चित्रपटातील मुख्य अभिनेता सुनील शेट्टी म्हणाला आहे की, “हे सगळं अचानक कसे घडले मला काहीच कळत नाही. या चित्रपटासाठी मी, अक्षय आणि परेश रावल एकत्र जमलो होतो. मात्र अक्षय कुमार या चित्रपटातून वेगळा झाला आहे या बातमीने मला आश्चर्याचा झटका बसला होता. मी या विषयावर चित्रपटाची निर्माते साजिद नाडियावाला यांच्याशी बसून चर्चा करणार आहे. आणि अक्षय ला या चित्रपटात परत आणण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे.” सुनील शेट्टीच्या या वक्तव्यानंतर अक्षय कुमारचा चाहत्यांना त्याची या चित्रपटांमध्ये परत येण्याची संभाव्यता दिसत आहे.
अक्षयने का नाकारला हेरा फेरी 3 (Hera Pheri 3)
हिंदुस्तान टाइम्सच्या 12 नोव्हेंबर रोजी झालेल्या समिटला अक्षय कुमार उपस्थित होता. दरम्यान त्याला हेरा फेरी विषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाचे उत्तर देताना अक्षय कुमार म्हणाला की, “मी हेरा फेरी चा भाग राहिला आहे. अनेक लोकांच्या आठवणी या चित्रपटाबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. बरोबर या चित्रपटाची माझ्याही चांगल्या आठवणी आहेत. मात्र मला खेद वाटत आहे की इतक्या वर्षात आम्ही या चित्रपटाचा तिसरा भाग बनवला नाही. जेव्हा मला या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाबद्दल कळाले तेव्हा या चित्रपटाची स्क्रिप्ट आणि स्क्रीन बघून मी समाधानी नव्हतो. त्यामुळे मी या चित्रपटातून बाहेर पडलो आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Skin Care Tips | त्वचेवरील चमक वाढवायची असेल तर, चेहरा धुतल्यानंतर वापरा ‘या’ गोष्टी
- Sanjay Nirupam On Gajanan Kirtikar | गजानन किर्तीकर ‘निकम्मा’ खासदार ; संजय निरुपम यांची टीका
- Travel Guide | गुलाबी थंडीमध्ये उबदारपणा अनुभवायचा असेल, तर ‘या’ ठिकाणांना द्या भेट
- Prakash Ambedkar | “ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी युती करणार?”; प्रकाश आंबेडकर म्हणाले,
- Congress | भारत जोडो यात्रेमध्ये भाजपकडून अडथळे ; काँग्रेसचा आरोप


