Share

महत्वाची बातमी : लस आली रे! भारतात पहिल्या लसीला परवानगी

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोरोना व्हायरससंदर्भात लसीकरणासाठी तयार राहावं, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे.2 जानेवारीला देशातील सगळी राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लसीकरणाची रंगीत तालीम म्हणजेच ‘ड्राय रन’ घेतली जाईल, असं केंद्र सरकारने म्हटलं आहे.

या सर्व हालचालींवरून लवकरच भारतात लसीला परवानगी मिळणार हे स्पष्ट झालं होतं. केंद्र सरकारने सर्व आरोग्य विभागासह राज्य सरकारनं देखील लसीकरणासाठी सज्ज व्हावं असं सांगितलं होतं. २०२० हे वर्ष संकटांचं ठरल्यानंतर २०२१ या वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशवासीयांसाठी आता खुशखबर मिळत आहे.

केंद्र सरकारने सिरम इंस्टिट्यूटच्या लसीला परवानगी दिली आहे. त्यामुळे, देशात पहिली परवानगी मिळालेली लस हि या सिरम संस्थेची ठरली आहे. ऑक्सफर्ड आणि ऍस्ट्रोजेनका या कंपनीनं विकसित केलेल्या ‘कोविशिल्ड’ या कोरोना लसीला मान्यता मिळाली आहे. कोव्हिशिल्ड लसीच्या आपत्कालिन वापराला मंजुरी मिळाली आहे. अभिमानाची बाब म्हणजे  या लसीचं उत्पादन पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्युटमध्ये सुरु आहे. ही लस आता देशात जरी वितरित होणार असली तरी सर्व नियम पाळत मास्क घालणे व हात धुणे हे आवश्यक असल्याचं देखील तज्ञ सांगत आहेत.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!