टीम महाराष्ट्र देशा : आम्ही वचनपूर्तीचे राजकारण करणारे आहोत. राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेत आल्यानंतर जर तीन महिन्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही, तर पवारांची औलाद सांगणार नाही. असा ठाम विश्वास व्यक्त माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अकलूज येथे आयोजित सभेत बोलताना व्यक्त केला. माळशिरज मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम जानकर यांच्या प्रचार सभेचा शुभारंभ पवार यांच्या भाषणाने झाला.
पवार म्हणाले, ” २००९ च्या निवडणुकीत आम्ही तुम्हाला पवाभूत करण्यासाठी आम्ही सभा घेतल्या. पण आता आम्ही तुमच्यासोबत आहोत. ही निवडणूक फार महत्त्वाची आहे. प्रस्थापितांच्या विरोधातील ही लढाई आपल्याला जिंकायची आहे. अच्छे दिन चे गजर दाखवून या सरकारने सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ केला. शेतकरी, व्यापारी, उद्योजक, महिलांच्या अपेक्षांचा भंग केला, असे म्हणत त्यांनी सरकारच्या अपयशी कामगिरीचा पाढा वाचला. तर राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी इडीने दाखल केलाला गुन्हा यातील विसंगती स्पष्ट केली.
तसेच, करमाळा विधानसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय पाटील यांचा अराज वेळेत माघारी घेणे शक्य झाले नाही. मात्र तेथे अपक्ष उमेदवार संजय शिंदे आणि सांगोला विधानसभेचे शेकापचे उमेदवार डॉ. अनिकेत देखमुख यांना राष्ट्र्वादीने पाठींबा दिला आहे. यावली जानकर यांच्यासह राजश्री लोंढे, उदय कांबळे, मनीषा कर्चे, अशोक नवगिरे आदि उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1181489078618984448?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1181485306702434304?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1181485147645980672?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

