Share

अजित पवारचं शिवसेनेचे स्टार प्रचारक, संजय राऊतांनी टाकली गुगली

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार हेचं शिवसेनेचे स्टार प्रचारक आहेत, असा टोला लगावला आहे. येवला – लासलगाव येथील सभेत बोलताना संजय राऊत यांनी ही टोलेबाजी केली आहे. बाळासाहेबांच्या अटकेची गोष्ट जी आम्ही सांगत नव्हतो, ती गोष्ट त्यांनीच सांगितली, असे राऊत म्हणाले.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांनी बाळासाहेब ठाकरेंच्या अटकेचा खुलासा केला. बाळासाहेब ठाकरेंना अटक करणे हे त्यावेळी अयोग्यचं होते. मात्र त्यावेळी आम्ही नको म्हणत असताना वरिष्ठांच्या हट्टापायी बाळासाहेबांना अटक करण्यात आली. बाळासाहेबांना अटक ही राष्ट्रवादीची चूक होती, असे अजित पवारांनी सांगितले होते. यावरून संजय राऊत यांनी अजित पवारांना टोला लगावला. तर त्या वरिष्ठांमध्ये असलेले छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला.

संजय राऊत म्हणाले की, अजित पवारच शिवसेनेचे स्टार प्रचारक आहेत. आता, तुरुंगात जाण्याची वेळ भुजबळांवरच आली, ते तुरुंगात गेले अन् तेथे 60 व्होल्टचे बल्ब लावले, भिंतीला रंग लावला. भुजबळांनी मतदारसंघात न केलेली विकासकामं तुरुंगात जाऊन केली, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1185554575668834304?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1185546279897616384?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1185545672528805888?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!