Share

अजित पवारांचे निकटवर्तीय बाबुराव चांदेरे यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा

Published On: 

पुणे- अजित पवारांचे निकटवर्तीय आणि पुणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक तसेच स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या घरावर आज सकाळी आयकर विभागाने छापा टाकला. बाणेर परिसरातील वीरभद्र नगरमध्ये बाबुराव चांदेरे यांचे घर आहे. या ठिकाणी आज सकाळी साडेसहाच्या सुमारास आयकर विभागाचे छापा टाकला आहे.मुलाच्या लग्नात कोट्यवधी रुपये खर्च केल्यामुळे चांदेरे चर्चेत आले होते.

काही दिवसांपूर्वीच मुलाच्या लग्नात कोट्यवधी रुपये खर्च केल्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. पुण्यात या लग्नाची चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर आज सकाळी साध्या वेषातील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी चांदेरे यांच्या घरावर छापा टाकला. आयकर विभाग आणि पोलिसांचे पथक अजूनही याठिकाणी उपस्थित असून चांदेरे यांची चौकशी केला जात आहे.

कोण आहेत बाबुराव चांदोरे?

बाबुराव चांदोरे आतापर्यंत तीनवेळा नगरसेवक म्हणून महापालिकेवर निवडून गेले आहेत तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेवकांपैकी एक आहेत.. त्यांनी कोथरूड मतदारसंघातून विधानसभेची निवडणुकही लढवली होती. मात्र, त्यांना यावेळी पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यांचे अनेक व्यवसाय होते. अजित पवारांचे निकटवर्तीय आणि पुणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक तसेच स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे भूषवलं आहे .

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!