मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि शिवसेना यांच्यातील वाद मिटण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. सध्या राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या दिशेने घडामोडी सुरु आहेत. शिंदे गटात आमदारांच संख्याबळ वाढताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांनी 46 आमदार सोबत घेऊन आपला वेगळा गट स्थापन केला आहे. तसेच सध्याच्या चालू घडामोडींवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर वक्तव्य केलं आहे.
नाना पटोलेंच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार कॉंग्रेस आमदारांनाही त्रास देत होते असा खुलासा नाना पटोले यांनी केला आहे. मविआ सरकारला कोणताही धोका नाही. विरोधी पक्षात बसायची आमची तयारी आहे, असं देखील पटोले म्हणाले आहेत. तर दुसरीकडे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं आहे. संजय शिरसाट यांच्या या पत्राने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, पत्रात शिरसाट म्हणालेत कि, आमदार म्हणून बंगल्यात प्रवेश करण्यासाठी, आम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या, लोकांमधून निवडून न येणाऱ्या, विधान परिषद आणि राज्यसभेत आमच्या जीवावर जाणाऱ्या बडव्यांची मनधरणी करायला लागत होती. हेच so called (चाणक्य कारकून) बडवे आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची रणनिती ठरवत होते. त्याचा निकाल काय लागला ते अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. तसेच so called (चाणक्य कारकून) असा उल्लेख करत शिरसाट यांनी अप्रत्यक्षरीत्या संजय राऊतांवर निशाणा साधल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या :


